पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना बांधावर खते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:11+5:302021-06-03T04:11:11+5:30
पेठ : एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आला असतांना दुसरीकडे कोरोनाच्या निर्बंधांमुळे बाजारपेठांमधील अनियमितता यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या पेठ तालुक्यातील ...
पेठ : एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आला असतांना दुसरीकडे कोरोनाच्या निर्बंधांमुळे बाजारपेठांमधील अनियमितता यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या पेठ तालुक्यातील बळीराजाच्या मदतीसाठी तालुका कृषी विभाग पुढे आला असून, शेतकरी गटांनी एकत्रित मागणी केलेल्या गावांना थेट बांधावर जाऊन खतांचे वाटप करण्यात आले.
पेठ तालुक्यात खरीप हंगामात भात व नागली हे दोन प्रमुख पिके घेतली जातात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी भाताच्या विविध प्रजाती उत्पादित करतात. यासाठी आवश्यक असणारी रासायनिक खते मागणीनुसार तालुका कृषी विभागाच्या वतीने घरपोच करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना बांधावर खते पाहिजे असतील, त्यांनी एकत्रित मागणी कृषी विभागाकडे नोंदवावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी केले आहे.
बाजारात खरेदीसाठी गर्दी
कोरोनाच्या निर्बंधात काही प्रमाणात सूट दिल्याने पेठसह करंजाळी, जोगमोडी, कोहोर आदी ठिकाणी शेतकरी बियाणे, खते व कृषीविषयक अवजारे खरेदी करताना दिसून आले.
-------------
खरिपासाठी मशागत
कोरोनासारख्या वैश्विक महामारीचे संकट डोईवर असताना खरीप हंगामासाठी मशागतीसोबत खरेदीसाठी बळीराजा बाहेर पडत आहे.
बीजप्रक्रियेवर भर
या वर्षीच्या खरीप हंगामात उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक पध्दतीने बीज प्रक्रिया करून घ्यावी, यासाठी कृषी विभागाच्या वतीने गावोगावी प्रात्यक्षिक देण्यात आले. भात नागलीसह सोयाबीनसारख्या बियाण्यांवर प्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होणार असल्याने बीजप्रक्रियेवर भर दिला जात आहे.
-----------------
अशी आहे खरिपाची स्थिती
एकूण क्षेत्र -२६ हजार हेक्टर
महसुली गावे -१४४
कृषी मंडल -२
बीजप्रक्रिया प्रशिक्षण गावे -११०
----------------------------
चोळमूख, ता. पेठ येथे शेतकऱ्यांना बांधावर खते वाटप करतांना कृषी विभागाचे कर्मचारी. (०२ पेठ १)
===Photopath===
020621\02nsk_13_02062021_13.jpg
===Caption===
०२ पेठ १