शेतकरी कंपनीकडून बांधावर खतविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 09:40 PM2020-06-01T21:40:12+5:302020-06-02T00:45:35+5:30
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील शेतमॉल अॅग्री प्रोड्यूसर कंपनीच्या शेतकरी सुविधा केंद्राद्वारे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन खते उपलब्ध करून देण्यात आली. शेतकऱ्यांनीच स्थापन केलेल्या या कंपनीमार्फत जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा पहिला प्रयोग राबवण्यात आला.
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील शेतमॉल अॅग्री प्रोड्यूसर कंपनीच्या शेतकरी सुविधा केंद्राद्वारे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन खते उपलब्ध करून देण्यात आली. शेतकऱ्यांनीच स्थापन केलेल्या या कंपनीमार्फत जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा पहिला प्रयोग राबवण्यात आला. कंपनीने आत्तापर्यंत आठ गावांतील १०० शेतकºयांपर्यंत खते पोहोचवली आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये याकरिता शेतकरी गटांनी मागणी करून विक्रेत्यांनी थेट बांधावर खते देण्याची संकल्पना सरकारमार्फत राबविली जात आहे. परंतु दोडी बुद्रुक येथील शेतकरी कंपनीने पुढाकार घेत हमाली, वाहतूक खर्च न आकारता ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शेतकºयांना खते उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीचे अध्यक्ष गणपत केदार, संचालक सुखदेव आव्हाड, मधुकर कांगणे, संतोष ऊगले, बाळासाहेब दराडे, विठ्ठल वाघ, चंद्रभान जाधव यांनी मेहनत घेतली, तर रावसाहेब दराडे, शिवाजी दराडे, दीपक बर्के आदींनी मदत केली. दोडी बुद्रुक येथील शेतकºयांनी एकत्र येत कंपनीची स्थापना केल्यानंतर शेतकºयांसाठी विविध उपक्रम राबविले. कांद्याला चांगला दर मिळण्यासाठी दिल्ली येथील बाजारपेठेत कांदा पाठवण्यात येतो. मंत्रालय आठवडे बाजारात कंपनीतर्फे नियोजन करून आठवडे बाजार चालविला जात आहे. लॅकडाउन काळात कंपनीने मुंबई येथे थेट घरपोहोच भाजीपाला उपक्रम राबवला आहे. तर आता शेतकºयांना माफक दरात बांधावर खते उपलब्ध करून दिली जात आहेत.
----------------------
आठ गावात खते
नळवाडी, कासारवाडी, चापडगाव, निºहाळे, खंबाळे, दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, नांदूरशिंगोटे या गावात शेतकºयांना बांधावर खते उपलब्ध करून दिली जात आहेत. शेतकºयांनी मागणी करताच कंपनीद्वारे विविध खतांचा पुरवठा करण्यात येत आहे.