खरिपासाठी खते-बियाणे बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:16 PM2020-05-08T22:16:41+5:302020-05-09T00:02:23+5:30

देवळा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, व किटकनाशके (कृषी निविष्ठा) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन देवळा तालुका कृषी विभागाने केले आहे.

 On fertilizer-seed dam for kharif | खरिपासाठी खते-बियाणे बांधावर

खरिपासाठी खते-बियाणे बांधावर

Next

देवळा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, व किटकनाशके (कृषी निविष्ठा) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन देवळा तालुका कृषी विभागाने केले आहे.
खरीप हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने सर्व कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, व मंडळ कृषी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यामध्ये असलेल्या संचारबंदीत शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांचा पुरवठा वेळेत होईल असे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या समन्वयाने कृषी निविष्ठांचा पुरवठा कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत शेतकºयांना बांधावर खते, बियाणे मिळणार आहेत. यामुळे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकºयांची गर्दी होणार नाही आणि त्यामुळे कोरोना विषाणू संक्रमणास आळा बसणार आहे.
गाव पातळीवर कृषी निविष्ठा मिळविण्यासाठी शेतकºयांनी त्यांच्या भागातील गटांकडे नोंदणी करावी. शक्यतो आत्मा अंतर्गत नोंदणी झालेल्या गटांकडेच नाव नोंदवावे. शेतकºयांनी त्यांच्या नावासह संपूर्ण तपशील (पत्ता, गट नंबर, मोबाइल क्रमांक, आधार क्र मांक, ज्या कृषी सेवा केंद्रामधून निविष्ठा खरेदी करायची त्याचे नाव आणि आवश्यक निविष्ठा) यांची मागणी गटाकडे नोंदवायची आहे. यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहतील. सोबतच ते वाहतुकीकरिता आवश्यक असणारे परवाने गटांकरिता उपलब्ध करून देतील.
शेतकरी गटप्रमुख नोंदणीनुसार बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करतील. खरेदीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी कृषी अधिकारी, कर्मचाºयांनी व्हिडीओ कॉलद्वारे शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्र ेत्यांमध्ये समन्वय घडवून आणला जाईल. शेतकºयांनी वाजवी असणाºया दरातच खरेदी करावी, अशा सूचना तालुका कृषी अधिकारी देवळा यांनी सर्व कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत.

Web Title:  On fertilizer-seed dam for kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक