३४ हजार शेतकऱ्यांच्या बांधावर खत पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 09:59 PM2020-06-05T21:59:59+5:302020-06-06T00:05:35+5:30
बांधावर खत पुरवठा योजने अंतर्गत जिल्'ातील ३४ हजार ८२0 शेतकऱ्यांच्या बांधावर १0 हजार ५७६ में. टन खत आणि ३ हजार 0२९.१७ क्विंटल बियान्याचा पुरवठा करण्यात आल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.
नाशिक : बांधावर खत पुरवठा योजने अंतर्गत जिल्'ातील ३४ हजार ८२0 शेतकऱ्यांच्या बांधावर १0 हजार ५७६ में. टन खत आणि ३ हजार 0२९.१७ क्विंटल बियान्याचा पुरवठा करण्यात आल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात लोकडाऊन सुरु आहे. याशिवाय हंगामात शेतकºयांनी खत व बियाने खरेदीसाठी दुकानात गर्दी करू नये यासाठी यावर्षी राज्य शासनाने शेतकºयांच्या बांधावर खते व बियाने पुरवठा करण्याची योजना सुरु केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत दुकांदारांच्या सहकार्यने ही योजना राबविली जात असून शेतकरी गटांमार्फ़त शेतकºयांच्या बांधावर बियाने आणि खतांचा पुरवठा केला जात आहे. कृषी विभागाने आत्मा अंतर्गत जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकºयांचे गट तयार केले असून गटांनी मागणी नोदविल्यानंतर कृषी विभागामारफत संबंधित दुकानाला कळउन शेतकºयांना मागनीप्रमाने पुरवठा करण्यात येतो. आतापर्यंत जिल्ह्यातील ३४ हजार ८२0 शेतकºयांना ३0२९.१७ क्विंंटल बियाने आणि १0 हजार ५७६ में. टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. ३0८0 कापूस बियान्यांची पाकिटे पुरविन्यात आली. सोयाबीन (५३३.४0), भात (१६८७.५५), मका (५६0.९५), इतर पिक (२४७.२७ क्विंंटल) या पिकांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, उपसंचालक कैलास शिरसाट यांनी दिली.