दोडी येथे बांधावर खत पुरवठा उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 08:32 PM2020-05-10T20:32:34+5:302020-05-10T20:33:17+5:30
नांदूरशिंगोटे : शेतकर्यांनी खरीप हंगामची तयारी सुरु केली आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभाग खरीप हंगामाच्या सुरु वातीपासून बांधावर खत पुरवठाचे नियोजन करत आहे. सध्या कोरोना विषाणू साथी रोगाचे थैमान सुरु असल्याने शेतकर्यांनी कृषि सेवा केंद्र वर गर्दी करून कोरानाच्या रोगाच्या प्रसारास कारणीभूत होऊ नये म्हणून कृषि विभागा कडून बांधावर खत पुरवठा चे नियोजन करण्यात येत आहे.
नांदूरशिंगोटे : शेतकर्यांनी खरीप हंगामची तयारी सुरु केली आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभाग खरीप हंगामाच्या सुरु वातीपासून बांधावर खत पुरवठाचे नियोजन करत आहे. सध्या कोरोना विषाणू साथी रोगाचे थैमान सुरु असल्याने शेतकर्यांनी कृषि सेवा केंद्र वर गर्दी करून कोरानाच्या रोगाच्या प्रसारास कारणीभूत होऊ नये म्हणून कृषि विभागा कडून बांधावर खत पुरवठा चे नियोजन करण्यात येत आहे. या उपक्र मची सुरु वात सिन्नर तालुक्यातील दोडी येथे जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार व पंचायत समतिीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या हस्ते वाहतूक गाडीस हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.
तालुक्यातील नळवाडी येथील स्वामी समर्थ शेतकरी बचत गट, नांदूरशिंगोटे येथील साईनाथ शेतकरी बचत गट आण िमोठेबाबा शेतकरी बचत गट यांनी एकत्र येऊन खतांची खतांची मागणी नोंदवण्यात आल्यानंतर दोडी येथील शेती मॉल शेतकरी उत्पादक कंपनी कडून सदर गटांना बांधावर खत पुरवठा करण्यात आला. या गटांना दोन वाहतूक गाड्यातून प्रत्येकी दोन टन खतांचा पुरवठा करण्यात आला. एकाच गावातील 10 ते 15 शेतकर्यांनी अथवा शेतकरी बचत गटांनी एकत्र येऊन आपल्याला आवश्यक बियाणे आण िखताची नोंदणी गावातील कृषि सहाय्याकडे अथवा वेब लिंक वर करावी असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळ वाघ यांनी यावेळी केले.या उपक्र मास आत्माचे उपसंचालक हेमंत काळे, तालुका कृषि अधिकारी आण्णासाहेब गागरे, मंडळ कृषि अधिकारी डी. सी. वार्डेकर, पर्यवेक्षक दत्तात्रय साळुंखे, सरपंच सौ. मीनाआव्हाड, माजी सरपंच पी. जी. आव्हाड, सुकदेव आव्हाड, गणपत केदार, बाळासाहेब दराडे, चंद्रभान जाधव, संतोष उगले, प्रकाश सानप सोमनाथ शेळके, रामदास केदार रावसाहेब दराडे, कृषी सहायक दादासाहेब जोशी, राम आदमे आदीसह शेतकरी उपस्थित होते.