इगतपुरीत शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:29 AM2020-06-01T00:29:10+5:302020-06-01T00:29:31+5:30
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शेतकºयांच्या बांधावर जाऊन त्यांना बियाणे, खते वाटपाचा उपक्रम कृषी विभागाने सुरू केला असून, या उपक्रमाचा तालुक्यात शुभारंभ करण्यात आला.
सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शेतकºयांच्या बांधावर जाऊन त्यांना बियाणे, खते वाटपाचा उपक्रम कृषी विभागाने सुरू केला असून, या उपक्रमाचा तालुक्यात शुभारंभ करण्यात आला.
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकºयांना बियाणे, खतांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कृषी सेवा केंद्रांवर खते, बियाणे खरेदीसाठी शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. यात शारीरिक अंतर पाळले न गेल्यास कोरोनाचा जास्त प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी महिला बचत गट, कृषी सहायक व शेतकरी गटामार्फत कृषी निविष्ठांचा पुरवठा शेतकºयांच्या बांधावर जाऊन करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने घोटी बुदु्रक येथील गजानन कृषी सेवा केंद्रामार्फत दौंडत गावातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. अधिकाधिक शेतकºयांनी या उपक्र माचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर व कृषी विभागाने केले आहे.
तसेच विविध पिकांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी तालुक्यातील प्रशिक्षित कृषिसखी, पशुसखी व बचत गटाच्या महिलांना बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बीजप्रक्रिया, माती नमुने व परीक्षण, जंगली भात निर्मूलन, दशपर्णी अर्क, जीवामृत तयार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.