महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकला भाविकांची पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:02 PM2018-02-13T13:02:01+5:302018-02-13T13:21:20+5:30
त्र्यंबकेश्वर -बारा ज्योतिर्लंिगांपैकी एक असलेल्या येथील मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
त्र्यंबकेश्वर -बारा ज्योतिर्लंिगांपैकी एक असलेल्या येथील मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पवित्र कुशावर्त तिर्थावर स्रानासाठी भाविकांनी गर्दी केली आाहे. महाशिवरात्रीला श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दर्शनासाठी भाविकांना प्राधान्य देणेचे नियोजन केले आहे.इतर घटक यात पुरोहित अभिषेकाला मंदिरात जाणारे यांचे साठी स्वतंत्र नियमावली केल्याने भाविकांना सुलभ दर्शन घडत आहे.
महाशिवरात्रीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता नियोजन व सुलभतेच्या दृष्टीने व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय लेखी प्रोटोकॉलव्यतिरिक्त अन्य सर्व शासकीय-निमशासकीय संस्थांचे अधिकारी, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर आदींनी व्हीआयपी दर्शनाचा आग्रह धरू नये, अशी विनंती तथा आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुमारे २५० अधिका-यांनी गर्दीसाठी नियोजन केले आहे. एसटी महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी २४ तास मंदीर खुले राहणार आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे दुपारी अडीच वाजता पालखी काढण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती ट्रस्टच्या पदाधिकाºयांनी दिली.