सुदृढ आरोग्यासाठी सण-उत्सवाची परंपरा : सोमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:14 AM2018-05-12T00:14:06+5:302018-05-12T00:14:06+5:30
मानवी मनाचे व शरीराचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्राचीन ऋ षी-मुनींनी समाजाला सण-उत्सवांची परंपरा दिली असून, आद्यऋषींनी ऋ तुचक्र ानुसार आहाराची आखणी करीत सणांची रचना केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्र अभ्यासक तथा पंचांगकर्ते दामोदर सोमण यांनी केले.
नाशिक : मानवी मनाचे व शरीराचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्राचीन ऋ षी-मुनींनी समाजाला सण-उत्सवांची परंपरा दिली असून, आद्यऋषींनी ऋ तुचक्र ानुसार आहाराची आखणी करीत सणांची रचना केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्र अभ्यासक तथा पंचांगकर्ते दामोदर सोमण यांनी केले.
गोदाघाटावरील देवमामलेदार पटांगणावर वसंत व्याख्यानमालेत सोमण यांनी शुक्रवारी (दि. ११) चौथे पुष्प गुंफले. बाबूराव हाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सण-उत्सव आणि विज्ञान’ या विषयावर बोलताना सोमण यांनी भारतीय सण-उत्सवांसह धर्म परंपरा व विज्ञान यांतील संबंध विशद केले. ते म्हणाले, भारतीय शास्त्रज्ञांनी विज्ञानाचा आमूलाग्र अभ्यास केला आहे. जगभरात कोणत्याही देशात चंद्र व सूर्यावर आधारित कालगणना केलेली नाही. ही किमया भारतीय शास्त्रकारांनी करून दाखवली असून, माणसाचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्राचीन ऋ षी-मुनींनी आहारशास्त्राला सणांची जोड दिली. पावसाळ्यात येणाऱ्या श्रावण महिन्यात पचनशक्ती मंदावत असल्याने हलका आहार घेण्याचे तथा उपवासाचे व्रत सांगण्यात आले असून, या आहार नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सण व उत्सवांना धार्मिक आधार देण्यात आला आहे. अशा प्रकारे पुण्यप्राप्तीची आशा दाखवल्याने लोक अधिक श्रद्धेने आहाराचे नियम पाळतात यावरही ऋषींनी अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले.
आजचे व्याख्यान , वक्ते : सुषमा पौडवाल , विषय : वाचन संस्कार व संस्कृती