कारसुळ येथे शेतकº्यांचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 04:12 PM2018-12-26T16:12:33+5:302018-12-26T16:12:41+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ,नारायण टेंभी,नजीक वडाळी येथील द्राक्ष बागा पाण्या अभावी संकटात सापडल्यामुळे संबधित शेतकº्यांनी कादवा नदी पत्रात पाणी सोडावे या मागणी साठी कारसुळ गावातील राममंदिर समोर आमरण उपोषण सुरु केले आहे .

 Festivals of farmers' hunger strike at Karsul | कारसुळ येथे शेतकº्यांचे आमरण उपोषण

  कारसुळ ,वडाळी व नारायण टेंभी येथील कादवा नदी पात्रात साठवण बांधणार्या मध्ये पाणी सोडावे या करिता उपोषणास बसलेले शेतकरी

Next
ठळक मुद्देकादवा नदीवरील रौळस बंधाº्यात पाणी नसल्याने परिसरातील सहाशे ते सातशे हॅकटरवरील द्राक्ष बागा संकटात सापडल्या असून,प्रशासनाने सिंचनासाठी कादवा नदी पात्रात पाणी सोडावे या मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले होते.मात्र प्रशासनाने कुठलाही उपाययोजना न केल्याने


पिंपळगाव बसवंत :
परिसरातील कारसुळ,नारायण टेंभी,नजीक वडाळी येथील द्राक्ष बागा पाण्या अभावी संकटात सापडल्यामुळे संबधित शेतकº्यांनी कादवा नदी पत्रात पाणी सोडावे या मागणी साठी कारसुळ गावातील राममंदिर समोर आमरण उपोषण सुरु केले आहे .
.यावेळी
भाऊसाहेब शंकपाळ,देवेंद्र काजळे,उत्तम शंकपाळ,नंदू पगार,अजय गवळी,ओमप्रकाश ताकाटे,सुहास शंकपाळ,संतोष जाधव,कैलास पगार,उद्धव काजळे, सचिन पगार,जीवन वाघचौरे,अण्णा शंकपाळ,प्रकाश काजळे,अमोल ताकाटे,नितीन ताकाटे,बाळासाहेब गवळी, दिनकर देवरे,संदीप काळे,प्रवीण वाघ,प्रताप प्रभाकर काजळे,मोहन वाघ,विठ्ठल गाडे,दौलत कडलग,प्रताप झाल्टे, नाना पगार, नितीन गवळी,श्रीनिवास गवळी,सुदाम ताकाटे,संजय वाघचौरे,बबनराव वाघचौरे,बाजीराव घोलप, आदीसह ग्रामस्थ व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने या उपोषणास सहभागी झाले आहे.(२६पिंपळगाव कारसुळ)


प्रतिक्रि या.....
कालव्यातून नदीला पाणी सोडावे या करिता या शेतकर्यांनी उपोषण सुरु केले आहे पण
नदीत पाणी सोडण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांच्या कडे असल्याने आम्ही आश्वासन देऊ शकत नाही पण येथील शेतकर्यांच्या समस्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे पाठवणार..

पाट बंधारे उपअभियंता
कापडणीस


कारसुळ ,वडाळी व नारायण टेंभी येथील कादवा नदी पात्रातील साठवण बांधणार्या मध्ये पाणी सोडायचे कि, नाही हा निर्णय पाट बंधारे विभागाचा आहे.संबधित विषयांचे निवेदन अहवाल आम्ही तहसीलदार यांच्या मार्फत पाट बंधारे विभागाला पाठवलेले आहे.त्यांनी येथील शेतकर्यांची मागणी बाबत योग्य निर्णय घ्यावा..

 



 

Web Title:  Festivals of farmers' hunger strike at Karsul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.