श्रावणातील सण सुने सूने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 04:13 PM2020-08-06T16:13:12+5:302020-08-06T16:14:03+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावामध्ये श्रावणातील सण कोरोना मुळे नागरिकांनी घरच्या घरी करण्यास पसंती दिली असल्यामुळे श्रावणातील सणांचा उत्साहच निघुन गेला आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावामध्ये श्रावणातील सण कोरोना मुळे नागरिकांनी घरच्या घरी करण्यास पसंती दिली असल्यामुळे श्रावणातील सणांचा उत्साहच निघुन गेला आहे.
सध्या शहरी व ग्रामीण भागात कोरोनाने आपले बस्तान बसविल्याने जनता आता घर सोडायला तयार होत नाही. त्यामुळे पाहुण्याचे पाहुण पण गेले, सणांचे सण पण गेले. आता सर्वच नागरिकांनी आॅनलाईन पसंती दिली आहे. कोरोनामुळे कोठे जाता येत नाही. सर्वच गावाच्या वेशीच्या आत सण साजरे केले जातात.
श्रावण महिन्यातील हे सण प्रामुख्याने येत असतात. मंगळागौरी, नागपंचमी, श्रावणी सोमवार, पुत्रदा एकादशी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळ अष्टमी (कृष्ण जन्मोत्सव), गोपालकाला, दहीहंडी, अजा एकादशी, शेतकरी वर्गाचा मुख्य सण पोळा, हरतालीका व्रत, ॠषिपंचमी, ज्येष्ठ गौरी आवाहन पुजा, गौरी विसर्जन आदी हिंदू धर्मातील सण श्रावण महिन्यात येत असतात. परंतु यंदा कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले असल्यामुळे या सणाचे परंपरा आणि वेगळेपणातील उत्साहच निघुन गेला आहे.
श्रावण महिना शिव भक्तांची महापर्वणी मानली जाते. परंतु यंदा मात्र कोरोनामुळे सर्व शिव भक्तांनी सर्वच पुजा, विधी, आरती आदी सर्व धार्मिक विधी नागरिकांनी आपल्या घरच्या घरीच गेल्याने श्रावणातील सर्वच सण सुने सूने पडले आहे. त्यामुळे सर्वच शिव भक्त नाराज झाले आहेत.
माझी श्रावण महिन्यात दर सोमवारी त्र्यंबकेश्वरची वारी गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची परंपरा आहे. परंतु यंदा कोरोनामुळे आम्हाला श्रावणातील सर्व सण, उत्सव या पासून दुर रहावे लागत असल्याने आम्हाला भगवंताची आस लागली आहे. आम्ही देवाला साकडे घातले आहे की हा कोरोनारूपी राक्षस लवकर नाश पावो. व पहिल्या सारखी जनता पुन्हा एकदा एकत्र येऊन सण साजरे करू, अशी अपेक्षा निर्माण होत आहे.
- शिव भक्त गुलाब महाराज.