वसंतोत्सवानिमित्त सोंगांची पर्वणी

By Admin | Published: May 12, 2017 11:23 PM2017-05-12T23:23:31+5:302017-05-12T23:24:03+5:30

त्र्यंबकेश्वर : येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वसंतोत्सवात सोंगे नाचविण्यात आल्याने तालुक्यातील ग्रामस्थांना मनोरंजनाची पर्वणी लाभली.

Festivals of Songs for Vasantotsav | वसंतोत्सवानिमित्त सोंगांची पर्वणी

वसंतोत्सवानिमित्त सोंगांची पर्वणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वसंतोत्सवात सोंगे नाचविण्यात आल्याने तालुक्यातील ग्रामस्थांना मनोरंजनाची पर्वणी लाभली. यात विविध देवतांसह दानवांची सोंगे नाचवण्यात आली. त्र्यंबकेश्वर सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून हा उत्सव साजरा केला जातो.  समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे यांच्या संकल्पनेनुसार आयोजित या कार्यक्रउत्सव समितीच्या प्रमुखपदी दीपक लढ्ढा यांची तर गोविंदराव मुळे यांच्यावर समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली. या सोहळ्यात समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमात ५० च्या वर सोंगे नाचविण्यात आली. यावेळी पारंपरिक सोंगांमध्ये गणपतीचे सोंग यश लोहगावकर यांनी, तर शारदामातेचे सोंग ओम परदेशी यांनी घेतले. खंडेराव वाघ्या मुरळी व म्हाळसाच्या सोंगांमध्ये अनुक्रमे श्रीकांत मुळे, पुष्कर महाजन हरीश गायधनी व नितीन लोहगावकर होते. चारण-बालम यांच्या भूमिकेत मिलिंद धारणे व हेरंब शिखरे, कच्छ मच्छरमध्ये अथर्व लोहगावकर व मानस जोशी, वराहचे सोंग दिनेश सातपुते यांनी घेतले. राम,लक्ष्मणच्या वेशभूषेत पीयूष देवकुटे, तन्मय वाडेकर, हनुमानाच्या भूमिकेत जंबू माळी- निनाद शिखरे व महेश गाजरे, लक्ष्मणाच्या भूमिकेत सुशांत निखाडे ओंकार दीक्षित, रावण, राम व लक्ष्मणाच्या भूषेत अनुक्रमे निखिल धारणे, अंबरीश कुलकर्णी व यज्ञेश चांदवडकर होते. बाळंतीण- सागर उगले, चारण-बालमच्या भूमिकेत मोहन लोहगावकर व कृपेश भट, एकादशी व राक्षसाच्या भूमिकेत अनुक्रमे गंधर्व वाडेकर व वैभव गाजरे, राक्षस व भैरव- मयूरेश दीक्षित व पीयूष देवकुटे, राक्षस- पवन भुतडा व लहरी राजा- कौशिक अकोलकर, राधा-कृष्णच्या भूमिकेत भाग्येश जोशी व संकेत उपासनी, कौरव ताटी व अर्जुन- मोहित लोहगावकर व प्रीतेश सारडा, पांडव ताटी व कर्ण-सिद्धांत शिखरे व योगेंद्र उपासनी, मोहिनी व भस्मासूर- वेदांत शिखरे व किरण देवकुटे, कल्पेश कदम यांच्यासह भागवती चौकातील सदस्यांनी सहभाग नोंदविला. शंकर व त्रिपुरासुर - विराज मुळे व समीर पाटणकर, रक्तांबिका व राक्षस- डॉ. शुभम आराधी व किरण देवकुटे, वेताळ व राजा विक्र म- केदार कळमकर व अभिषेक देशमुख, नरसिंह व राजा हिरण्यकश्यप- भूषण दाणी व अक्षय लाखलगावकर, वीरभद्र व राजा यांच्या भूमिकेत अनुक्रमे गौरव धारणे व अभिषेक चांदवडकर आदंींनी सोंगे नाचविली.सर्व प्रेक्षकांचे सेवा समतिीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे ,दीपक लढ्ढा, प्रशांत गायधनी, सुनील लोहगावकर, गिरीष जोशी आदिंनी आभार मानले आहेत. सुत्रसंचालन मंगेश धारणे, गिरीश जोशी, प्रशांत गायधनी आदींनी केले.







 

Web Title: Festivals of Songs for Vasantotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.