शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:15+5:302021-09-09T04:19:15+5:30

नाशिक : बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता तलाठी किंवा कृषी सहायकाला पीक पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याची गरज राहिलेली नाही. ...

Fever of 'e-crop' inspection on farmers' heads! | शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप !

शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप !

Next

नाशिक : बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता तलाठी किंवा कृषी सहायकाला पीक पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याची गरज राहिलेली नाही. आता ई-पीक पाहणी केली जात आहे. यात शेतकऱ्यानेच आपल्या मोबाईलवर ई-पीक पाहणीचे ॲप डाऊनलोड करुन त्यात असलेली माहिती भरायची आहे. त्याचबरोबर आपल्या क्षेत्रात जाऊन पिकाचे फोटो ॲपवर अपलोड केले की त्याची माहिती थेट संबंधित गावच्या तलाठ्याकडे जाते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा पर्याय सोयीचा झालेला असला, तरी अनेक शेतकऱ्यांना ॲन्ड्रॉईड मोबाईल हाताळण्याची सवय नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ॲपवरील सर्व माहिती भरणे, फोटो अपलोड करणे या सर्व तांत्रिक गोष्टी तर आहेतच, पण सर्वात मोठा कनेक्टिव्हिटीचा प्रश्नही अनेक वेळा निर्माण होतो. यामुळे वारंवार प्रयत्न करूनही ते यशस्वी होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

एकूण नोंदणी - ८९१८०

ॲक्टिव्ह - ८४५५०

इनॲक्टिव्ह - ४६३०

चौकट -

हाताळणी कोण शिकवणार?

कोट-

मला साधा मोबाईल वापरता येत नाही, त्यात आता हे कसे करायचे हा प्रश्नच आहे. यामुळे अनेक अडचणी येत आहेत. मोबाईल वापरायचा कसा येथून मला सुरुवात करावी लागणार आहे. - अशोक दौंडे, शेतकरी

कोट-

ॲपमध्ये माहिती भरणे आणि पिकाचे फोटो काढून ते अपलोड करणे ही प्रक्रिया खूपच किचकट आहे. मोबाईल वापरताना खूप गोंधळ होतो. दोनवेळा मुलाला सांगितले पण त्यालाही ते व्यवस्थित जमले नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. - दावल पगारे, शेतकरी

चौकट-

कोट-

इ-पीक पाहणीसंदर्भात गावोगावी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षित झालेल्या २५ शेतकऱ्यांच्या गटाणे गावांतील इतरांनाही प्रशिक्षित करावे अशी संकल्पना आहे. याशिवाय गावोगावी या संदर्भात जनजागृती फलक लावण्यात आले आहे. आज बहुतेक शेतकऱ्यांकडे ॲन्ड्रॉइड मोबाईल आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फारशा अडचणी येणार नाहीत. - कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी

Web Title: Fever of 'e-crop' inspection on farmers' heads!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.