महाराजस्व अभियानातून शेतरस्ता खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:41 PM2020-01-31T23:41:35+5:302020-01-31T23:42:39+5:30
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : वर्षांनुवर्षं अतिक्रमण होऊन बंद झालेला खंबाळे येथील शेतरस्ता महाराजस्व अभियानातून शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : वर्षांनुवर्षं अतिक्रमण होऊन बंद झालेला खंबाळे येथील शेतरस्ता महाराजस्व अभियानातून शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे.
शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत लोकसहभागातून अनेक वर्षांपासून बंद झालेले शिव व शेतरस्ते खुले करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दहा फूट रूंद रस्ता लोकसहभागातून जेसीबीच्या साह्याने अतिक्रमित भाग काढून खुला करण्यात आला. खंबाळे भागातील शेतकऱ्यांनी शेताकडे जाण्यासाठी या रस्त्याची मागणी केली होती. सातत्याच्या पाठपुराव्याने रस्ता खुला करण्यात आल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त करण्यात आले.
गावातून दुगावकडे जाणारा रस्ता खुला झाल्याने शेतकरी व नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रस्ता बंद असल्याने शेतकºयांना पायी शेतमालाची वाहतूक करावी लागायची. आता रस्ता खुला झाल्याने शेतमालाची ने-आण करण्यासाठी सोईस्कर झाले आहे.
तहसीलदार दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत सरपंच रामदास गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.खंबाळे येथील शेतरस्ता बंद असल्याने शेतकºयांना शेतमालाची वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतकºयांमध्ये वाद होत असल्याने काही शेतकºयांनी या रस्त्याची मागणी केली होती. शासनाच्या महाराजस्व अभियानातून हा रस्ता खुला करण्यात आल्याने शेतमालाची वाहतूक करताना शेतºयांची अडचण दूर होईल.
- दीपक गिरासे, तहसीलदार, त्र्यंबकेश्वर