बागलाण तालुक्यात मोरांसाठी शेतात तयार केले पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:11+5:302021-05-29T04:12:11+5:30
सटाणा : मेच्या अखेरीस उन्हाच्या झळांची तीव्रता वाढल्याने काही भागांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कोटबेल, खिरमाणी परिसरात पाणीटंचाईच्या ...
सटाणा : मेच्या अखेरीस उन्हाच्या झळांची तीव्रता वाढल्याने काही भागांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कोटबेल, खिरमाणी परिसरात पाणीटंचाईच्या झळा माणसांबरोबर पशू-पक्ष्यांनाही बसताना दिसून येत आहेत. या परिसरातील मोरांचा पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे. यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात थेट मानवी वस्तीकडे धाव घेतात व अनेक दुर्घटना घडताना दिसून येतात. हे टाळण्यासाठी युवा शेतकरी महेंद्र खैरनार यांनी कोटबेल (ता.बागलाण) येथील पावडगड शिवारातील शेतात वन्यप्राणी व पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करून या प्राण्यासाठी पाणी उपलब्ध करून देत भूतदयेचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. तालुक्यातील बहुतेक गावांमधील भूमिगत पाण्याची पातळी घटली आहे. सध्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
----------------
टँकरने पाणीपुरवठा
तालुक्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. गाव असो की शेती किंवा पशूपक्षी यांच्या समोरही पाणी समस्या निर्माण झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खैरनार यांनी कोटबेल येथील पावागड शिवारातील शेतात जंगली प्राणी व पशू-पक्षी यांना पाणी पिण्यासाठी एक छोटेसे तळे निर्माण करून यात चोवीस तास पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पाणी मोजकेच उपलब्ध असताना त्यांनी ही किमया साधत प्राणिमात्राविषयी माणुसकीचे एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.
---------------------
शेतात कांद्याचे पीक होते, तेव्हा पाणी पिण्यासाठी मोर मोठ्या प्रमाणात येत; पण पीक काढणी झाल्यावर या मोरांना पाण्याची सोय उरली नाही. रोज ते त्याठिकाणी येत; पण पाणी नसल्याने कासावीस होऊन निघून जात होते. हे बघितल्यावर वाईट वाटले आणि मग मनात विचार आला की यांना शेतात छोटे तळे बनवून पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. त्यानुसार ही कल्पना राबविली. शेवटी भूतदया हीच ईश्वर सेवा.
महेंद्र खैरनार, युवा शेतकरी (२८ सटाणा १)
===Photopath===
280521\28nsk_16_28052021_13.jpg
===Caption===
२८ सटाणा १