मालेगाव मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांनी लावली फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:18 AM2021-08-27T04:18:42+5:302021-08-27T04:18:42+5:30
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ प्रभागांतून ८४ नगरसेवक निवडून गेले होते. २४ मे २०१७ रोजी मतदान होऊन २६ मे ला ...
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ प्रभागांतून ८४ नगरसेवक निवडून गेले होते. २४ मे २०१७ रोजी मतदान होऊन २६ मे ला मतमोजणी झाली होती. आता निवडणूक आयोगाने वॉर्डनिहाय निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून वॉर्ड रचनेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अंतिम रचना, आरक्षण सोडत व इतर कार्यवाही निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार होणार आहेत. सध्या महापालिकेत काँग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे. काँग्रेस-शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी जनता दल, महागठबंधन आघाडी, भाजप, मनसे, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी व्यूहरचना केली आहे. वॉर्डनिहाय आता निवडणूक होणार असल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत. सुरक्षित वॉर्ड शोधण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. ८४ नगरसेवक असल्याने तेवढेच प्रभाग होतील की त्यात काही घट होईल याबाबत साशंकता असून, इच्छुकांमध्ये मात्र तर्कवितर्क केले जात आहेत.