येवल्यात रोडरोमिओंविरोधात धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:50 PM2020-01-09T12:50:57+5:302020-01-09T12:51:50+5:30

येवला : शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात व कट्ट्यावर घिरट्या घालणार्या रोडरोमीओंविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे.

 Fierce campaign against the Rodarami in the coming days | येवल्यात रोडरोमिओंविरोधात धडक मोहीम

येवल्यात रोडरोमिओंविरोधात धडक मोहीम

Next

येवला : शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमीओंविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईत येवला शहर पोलिसांनी तिघांवर शांतात भाग करून सार्वजनिक ठिकाणी दंडात्मक करण्याचा धडाका लावला आहे. येथील गंगादरवाजा भागात दोन मोठी विद्यालये आहेत. सुमारे सात हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.विद्यार्थ्यांच्या मधली सुटीसह शाळा सुटण्याच्या वेळेत अनेक रोडरोमीओ आपला काम धंदा सोडून शालेय परिसरात घिरट्या घालत असल्याचे चित्र दिसत असते.शालेय प्रशासन अनेकदा या गुंड प्रवृत्तीच्या व दहशत निर्माण करणार्या रोडरोमीओ विरोधात आवाज उठवत असले तरी कायद्याच्या मर्यादा पडतात. परंतु आता येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी व पोलीस उपनिरीक्षक वाय.ए.चव्हाण यांनी अशा बेताल युवकांच्या विरोधात मोहीम उघडली असून धडक कारवाईला सुरु वात केली आहे. यामुळे काही प्रमाणात अशा रोडरोमीओना काही प्रमाणात आळा बसला असला तरी मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. महागड्या गाड्या घेवून शाळा महाविद्यालय परिसरात घिरट्या घालत विनाकारण त्रास देणाऱ्या या प्रवृत्तींविरोधात कारवाई करण्याची मागणी होत असल्याने पोलिसांनी तिघांवर प्रतिबंधात्मक दंडात्मक कायदेशीर कारवाई केली आहे. विविध शाळांच्या मधल्या सुटीची वेळ सकाळी ९ ते १० च्या दरम्यान व शाळा सुटण्याची वेळ ११.४० ते १२.३० अशा आहेत. या वेळेत पोलिसांनी गस्त वाढवावी अशी अपेक्षा येथील शाळा प्रशासन प्रमुखांनी व्यक्त केली आहे.
===================================
पोलीस शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आपले कर्तव्य पाडत आहे.पोलीस गाड्यांची गस्त देखील सुरु ठेवण्यात येईल. मुली,महिला,सुरक्षिततेसाठी पोलीस प्रयत्न करीत आहेच.काही प्रकार निदर्शनास आल्यास शाळा प्रमुखांसह नागरिकांनी देखील थेट पोलिसांशी संपर्क साधावा. विनाविलंब कारवाई केली जाईल. गेल्या दोन दिवसात तीन रोडरोमीओ विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
-संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक,येवला

Web Title:  Fierce campaign against the Rodarami in the coming days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.