भरधाव कारची नऊ मुलांना धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:58 AM2018-10-15T00:58:31+5:302018-10-15T00:58:46+5:30

कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या नऊ मुलांना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१४) पहाटेच्या सुमारास साईनाथनगर चौफुलीजवळ घडली़ विशाल नामदेव पवार (११, रा़ वडाळागाव, कोळीवाडा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, दोघा गंभीर जखमींपैकी एकावर खासगी रुग्णालयात तर दुसऱ्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़

Fierce car hits nine children; One killed | भरधाव कारची नऊ मुलांना धडक; एक ठार

भरधाव कारची नऊ मुलांना धडक; एक ठार

Next
ठळक मुद्देसाईनाथनगर चौक : कालिकेच्या दर्शनासाठी जात असताना घडली घटना

इंदिरानगर : कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या नऊ मुलांना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१४) पहाटेच्या सुमारास साईनाथनगर चौफुलीजवळ घडली़ विशाल नामदेव पवार (११, रा़ वडाळागाव, कोळीवाडा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, दोघा गंभीर जखमींपैकी एकावर खासगी रुग्णालयात तर दुसऱ्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ या अपघाताची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, फरार कारचालकाचा शोध सुरू आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळागावातील कोळीवाडा येथील १० ते १५ वयोगटातील अल्पवयीन मुले पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जात होते़ साईनाथनगर चौफुलीजवळून ही मुले जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या लाल रंगाच्या कारने या मुलांना जोराची धडक दिली़ या धडकेमध्ये विशाल नामदेव पवार (११), साहिल खंडू कडाळे (१४), रोहन बापू मोरे (१२), कृष्णा दत्तू खोडे (९), राहुल बापू मोरे (१५), अश्विन दत्तू खोडे (१४), ऋषिकेश सुनील वाघ (१०), तुषार गोविंद खाडम (१५) हे जखमी झाले़ यापैकी गंभीर जखमी असलेल्या विशाल पवारचा मृत्यू झाला तर तुषार खाडम याच्यावर खासगी रुग्णालयात तर कृष्णा खोडे व इतर जखमींवर जिल्हा रुग्णाालयात उपचार सुरू आहेत़
या अपघातानंतर कारचालक फरार झाला तर पहाटेची वेळ असल्याने जखमी मुलांना मदत मिळण्यास उशीर झाला़ मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाच्या वाहनात काही जखमी मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे वडाळागाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़
दोघांना दुचाकीवरून रुग्णालयात हलविले

रुग्णवाहिका अखेरपर्यंत आलीच नाही
पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास अपघात घडला. साडेतीन वाजेपर्यंत सर्व जखमी मुले रस्त्यावरच पडून होती. पोलिसांची गाडी घटनास्थळी आली आणि त्यांनी नातेवाइकांना रुग्णवाहिका येत असल्याचे सांगितले, मात्र अखेरपर्यंत रुग्णवाहिका तेथे पोहचलीच नाही. नातेवाइकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी पोलिसांना विनवणी करत जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी चार जखमी मुलांना वाहनातून रुग्णालयात दाखल केले तर उर्वरित तिघांना नातेवाइकांनी दुचाकीवरून रुग्णालयात हलविले.

Web Title: Fierce car hits nine children; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.