पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे समान वाटपाचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:46+5:302021-06-10T04:11:46+5:30
पंधराव्या वित्त आयोगाचे नियोजन हे मानवविकास निर्देशांकानुसार करावे की भौगोलिक क्षेत्रफळाच्या आधारे करायचे याविषयी ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन मागविण्यात आल्याचे ...
पंधराव्या वित्त आयोगाचे नियोजन हे मानवविकास निर्देशांकानुसार करावे की भौगोलिक क्षेत्रफळाच्या आधारे करायचे याविषयी ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन मागविण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यासाठी जिल्ह्यातील १२७५ ग्रामपंचायतींचे पीएमएस पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून हा निधी प्राप्त झालेला असताना केवळ नियोजनाअभावी तो खर्च होत नसल्याबद्दल सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचना डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी मांडली. त्याविषयी प्रत्येक सदस्यांकडून पत्र मागविण्याची सूूचनाही त्यांनी प्रशासनाला दिली. निधी वाटपात कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, तसेच तरतुदींच्या अनुषंगाने सर्व बाबी विचारात घेऊन येत्या १५ दिवसांत नियोजन पूर्ण करण्याचे आदेश अध्यक्षांनी यावेळी दिले. सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर, शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, समाजकल्याण सभापती सुशिला मेंगाळ यांसह विभागप्रमुख, सदस्य उपस्थित होते.