पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:11+5:302021-05-11T04:15:11+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) कोरोनाच्या ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) कोरोनाच्या संकटामुळे यापूर्वी दोन महिने पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा २३ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता पुन्हा पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने पुढे ढकलण्यात आल्याने लांबणीवर गेली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) कोरोनाच्या संकटामुळे यापूर्वी दोन महिने पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता आणखी पुढे ढकलण्यात आली असून, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २३ मे २०२१ रोजी होणार होती. परंतु राज्य शिक्षण मंडळाने व सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होणार की नाही, याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम अखेर संपुष्टात आला असून, ही परीक्षा होणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. मात्र ती कधी होणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. शिष्यवृत्ती परीक्षा अनिश्चित काळासाठी आणखी पुढे ढकलण्यात आली असून, परीक्षेची तारीख यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.