अकरावीसह पाचवी ते नववी वर्ग पुन्हा ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:25 AM2021-03-04T04:25:02+5:302021-03-04T04:25:02+5:30

नाशिक : महापालिका क्षेत्रात काेराेना नियंत्रणात असल्याचे संकेत दिसून लागल्याने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे आणि २७ ...

Fifth to ninth grade with eleven again online | अकरावीसह पाचवी ते नववी वर्ग पुन्हा ऑनलाईन

अकरावीसह पाचवी ते नववी वर्ग पुन्हा ऑनलाईन

Next

नाशिक : महापालिका क्षेत्रात काेराेना नियंत्रणात असल्याचे संकेत दिसून लागल्याने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र फेब्रुवारीत पुन्हा रुग्ण वाढू लागल्यामुळे शहरातील अकरावीसह पाचवी ते नववीचे वर्ग १३ दिवसासाठी बंद करण्यात आले असून या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. तर शहरातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सध्या केवळ दहावी व बारावीचे वर्ग सुरू असून त्यासाठीही विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांची संमती अनिवार्य करण्यात आली आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात काेराेनाचा प्रभाव वाढल्यामुळे शहरातील शाळा २२ मार्च २०२० पासून बंद करण्यात आल्या होत्या. या शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद हाेत्या. पहिल्या टप्प्यात ४ जानेवारीला नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. शाळेतून काेराेना पसरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका क्षेत्रातील २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्यात आले. नाशिक शहरात महापालिका व खासगी शाळा मिळून जवळपास पाचवी ते आठवीचे १ लाख १० हजार ७७३ विद्यार्थी असून २ हजार ६०२ शिक्षकांमार्फत दिवसाआड ५० टक्के उपस्थितीत शाळा सुरू झाल्या होत्या.

इन्फो

क्लासेसमध्येही दहावी बारावीचेच विद्यार्थी

शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर खासगी कोचिंग क्लासेसबाबत काय निर्णय होणार याबाबत उत्सूकता निर्माण झाली होती. परंतु, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे महापालिका आयुक्तांंच्या निर्णयाप्रमाणेच पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे क्लासही बंद केले आहेत. यासंदर्भात संघटनेच्या सभासदांना सुचना करण्याच आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी दिली.

इन्फो

ग्रामीण भागातील शाळा सुरूच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग बंद करून ऑनलाईन शिक्षण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही शाळा सुरू आहे. ग्रामीण भागातील शाळांविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

पॉईंटर

महापालिकेच्या शाळा : १०२

खासगी शाळा : ३०३

एकूण शाळा- ४०५

--

शिक्षकांची संख्या

महापालिका : ४७५

खासगी शाळा : २,१२७

एकूण : २,६०२

--

५ वी ते ८ वीचे विद्यार्थी

महापालिका शाळा : १५,४७६

खासगी शाळा : ९५,२९७

एकूण : १,१०,७७३

Web Title: Fifth to ninth grade with eleven again online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.