पंचवटीत अतिरिक्त घंटागाड्या दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:40 PM2020-02-20T23:40:43+5:302020-02-21T00:29:22+5:30
गेल्या काही महिन्यांपासून पंचवटी विभागात घंटागाडीचे तीन तेरा वाजल्याने जागोजागी कचºयाचे ढिगारे साचून आहेत. प्रभागात दैनंदिन घंटागाडी येत नसल्याने शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासन दखल घेत नाही, असा आरोप लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार पश्चिम व पूर्व विभागात घंटागाडीचा ठेका असलेल्या ठेकेदाराकडून पंचवटी विभागातील कचरा गोळा करण्यासाठी गुरुवारी अतिरिक्त सहा घंटागाड्या दाखल झाल्या आहेत.
पंचवटी : गेल्या काही महिन्यांपासून पंचवटी विभागात घंटागाडीचे तीन तेरा वाजल्याने जागोजागी कचºयाचे ढिगारे साचून आहेत. प्रभागात दैनंदिन घंटागाडी येत नसल्याने शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासन दखल घेत नाही, असा आरोप लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार पश्चिम व पूर्व विभागात घंटागाडीचा ठेका असलेल्या ठेकेदाराकडून पंचवटी विभागातील कचरा गोळा करण्यासाठी गुरुवारी अतिरिक्त सहा घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत एकूण पंधरा घंटागाड्या उपलब्ध होणार असल्याने आगामी पंधरवड्यात पंचवटीतील ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत ते भाग स्वच्छ करून परिसर कचरामुक्त करण्याचा प्रशासनाचा विशेष प्रयत्न असल्याची माहिती पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे यांनी दिली. गुरुवारी (दि. २०) पंचवटी विभागीय कार्यालयात महापालिका घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. सुनील बुकाने, विभागीय अधिकारी विवेक धांडे, डॉ. प्रमोद सोनवणे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे व स्वच्छता निरीक्षक यांची बैठक झाली. या बैठकीत आगामी नवीन घंटागाडी ठेका सुरू होईपर्यंत पूर्व, पश्चिम विभागात सध्या कार्यरत असलेल्या ठेकेदाराच्या काही घंटागाड्या पंचवटीत फिरविण्याबाबत आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराला आदेश दिल्याने त्याबाबत चर्चा करण्यात आली. बंद घंटागाडीवर काम करणाºया कर्मचाऱ्यांचे खाडे पडत असून, परिणामी त्यांचा रोजंदार बुडत आहे. त्यांचा रोजंदार बुडू नये यासाठी घंटागाडी युनियन पदाधिकाºयांशी घंटागाडी शेडवर बैठक झाली. या बैठकीत नादुरुस्त बंद असलेल्या घंटागाडीवरील कर्मचाºयांनी रोज दुपारी पंचवटीत दाखल होणाºया अतिरिक्त घंटागाडीवर जाऊन काम सुरू करावे, अशा सूचना देण्यात आल्या. दरम्यान, गुरुवारी ६ घंटागाड्या दाखल झाल्या असून, कचरा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पूर्व आणि पश्चिम विभागात फिरणाºया घंटागाड्या त्यांच्या विभागातील काम आटोपल्यावर पंचवटीत येतील व ज्या ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत त्याठिकाणचा कचरा उचलून परिसर स्वच्छ करणार आहेत. पंचवटीत ४९ घंटागाड्या असून, त्यापैकी सध्या डझनभर घंटागाड्या बंद आहेत.