बनावट चेक व सही शिक्क्याने साडेनऊ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:34 AM2019-06-14T00:34:01+5:302019-06-14T00:35:32+5:30
येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक येवला शाखेतून मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत खात्यावरील ९ लाख ३९ हजार रु पये बनावट धनादेश व सरपंच, ग्रामसेवक यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून परस्पर काढून घेण्यात आले. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये ग्रामसेवक नीलिमा बोरसे यांच्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले आहे. पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबत चौकशी सुरू होती.
येवला : तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक येवला शाखेतून मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत खात्यावरील ९ लाख ३९ हजार रु पये बनावट धनादेश व सरपंच, ग्रामसेवक यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून परस्पर काढून घेण्यात आले. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये ग्रामसेवक नीलिमा बोरसे यांच्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले आहे. पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबत चौकशी सुरू होती.
दि. १२ जून रोजी ठेकेदार गोविंद गायके यांना त्यांच्या कामाच्या ठेक्यातून काही रक्कम अदा करायची होती. म्हणून ते धनादेश घेऊन बँकेत गेले असता खात्यावर पैसे शिल्लक नसल्याचे त्यांना समजले. त्यांनी तसे ग्रामसेवकांना सांगितले. ग्रामसेवकांनी बँक अधिकाºयांकडे याबाबत चौकशी केली असता दि. १९ जानेवारी रोजी पाच धनादेशांद्वारे ९ लाख ३९ हजार रु पये देवनाथ माधव गायके याने याच बँकेतील खात्यावर जमा केले. हे सर्व धनादेश वेगवेगळ्या तारखांना त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे बँक अधिकाºयांनी सांगितले.
सदरचे चेकबुक ग्रामपंचायतीच्या अभिलेखावरील नसल्याचे ग्रामसेवक नीलिमा बोरसे यांनी बँक अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले. सरपंच व ग्रामसेवक यांचे सही व शिक्के हेदेखील बनावट असल्याचे बोरसे यांनी निदर्शनास आणून दिले.
अधिक माहिती घेतली असता बँकेच्या चेकबुक नोंदणी पुस्तिकेत माजी सरपंच प्रकाश कारभारी गायके यांनी १ आॅगस्ट २०१८ रोजी चेक क्र . १६८११ ते १६८२० व १६८२१ ते १६८३० अशी दोन चेकबुक्स बँकेकडून स्वत:च्या स्वाक्षरीने घेतलेली आहेत. ग्रामपंचायतीकडे अगोदरच काही चेक शिल्लक असताना व नवीन चेकबुकची मागणी केलेली नसतानादेखील बँकेने त्यांना चेकबुक दिले कसे? असा सवाल ग्रामसेविका बोरसे यांनी करून त्यांनी चेकबुक मागणीचा अर्ज मागितला असता अर्ज उपलब्ध नसल्याचे बँक अधिकाºयांनी सांगितले.
या खात्याशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरची तपासणी केली असता सदरचा मोबाइल ग्रामसेविका बोरसे यांचा नसून दुसराच नंबर त्या खात्याशी लिंक केल्याचे आढळून आले. देवनाथ गायके यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील खात्यावर तर माजी सरपंच प्रकाश कारभारी गायके यांच्या बँक आॅफ इंडिया अंदरसूल शाखेच्या खात्यात ३ लाख ९५ हजार रु पये वर्ग केले आहेत.
कडक कारवाईची मागणी
ग्रामसेवक बोरसे यांनी तक्र ारीत म्हटले आहे की, संशयित कागदपत्रे, चेकबुक, ग्रामसेवक व सरपंच यांचे बनावट सही, शिक्के बघता महाराष्ट्र ग्रामीण बँक येवला शाखेतील तत्कालीन काही अधिकारी व कर्मचारी तसेच देवनाथ गायके व प्रकाश गायके यांनी संगनमताने सदर शासकीय रकमेचा अपहार केल्याची शक्यता आहे. सदर घटनेबद्दल उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच वंदना डमाळे यांनी केली आहे.