नाइट कर्फ्यू ; पहिल्याच दिवशी पावणेनऊशे लोकांना कारवाईचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 09:46 PM2020-07-01T21:46:49+5:302020-07-01T21:47:26+5:30

बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपासून सर्वच पोलीस ठाणे हद्दीत गस्तीपथकाद्वारे व्यावसायिकांनाही सुचना देण्यात आल्या व नाकाबंदी पॉइंट सक्रीय करत दुचाकीस्वारांकडे चौकशी करण्यात आली.

Fifty-nine hundred people were hit on the first day | नाइट कर्फ्यू ; पहिल्याच दिवशी पावणेनऊशे लोकांना कारवाईचा दणका

नाइट कर्फ्यू ; पहिल्याच दिवशी पावणेनऊशे लोकांना कारवाईचा दणका

Next
ठळक मुद्देजमावबंदी, संचारबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू

नाशिक : शहर व परिसरात सातत्याने कोरोनाचे संक्रमण वेगाने सुरू आहे. बुधवारी (दि.१) शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात "मिशन बिगिन अगेन" अंतर्गत प्रभावीपणे जमावबंदी, संचारबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. सुमारे ८४६ इसमांवर पोलिसांनी दिवसभरात कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीवर एकापेक्षा अधिक प्रवास करणारे, मास्क न वापरणारे तसेच ह्यडिस्टन्सह्ण न बाळगणाऱ्या बेजबाबदार लोकांचा सहभाग आहे.

महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. ह्यमिशन बिगीन अगेनह्ण जरी सुरू असले तरीदेखील लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविला गेला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही संध्याकाळी ७ वाजेनंतर बाहेर विनाकारण पडण्यावर तसेच व्यवसायाबाबतही निर्बंध जाहीर केले आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी व संचारबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आदेश पारित केले आहे.
पोलीस आयुक्तालयाकडून शहरात चोखपणे 'नाइट कर्फ्यू'ची अंमलबजावणी करण्याचे आदेश मंगळवारीच (दि.३०) देण्यात आले. बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपासून सर्वच पोलीस ठाणे हद्दीत गस्तीपथकाद्वारे व्यावसायिकांनाही सुचना देण्यात आल्या व नाकाबंदी पॉइंट सक्रीय करत दुचाकीस्वारांकडे चौकशी करण्यात आली. यावेळी अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना तत्काळ मार्गस्थ करून देण्यात आले; मात्र विनाकारण रस्त्यावर प्रवास करण्यासाठी उतरलेल्या दुचाकीचालकांचे पहिल्या दिवशी समुपदेशन करून ताकीद देत सोडण्यात आले; मात्र ज्या दुचाकीचालकांनी मास्क परिधान केलेला नव्हता किंवा एकापेक्षा अधिक प्रवाशी बसविलेले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Web Title: Fifty-nine hundred people were hit on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.