भाच्यानेच केली साडेसतरा लाख रुपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:07 AM2019-03-18T01:07:39+5:302019-03-18T01:08:50+5:30

तिडके कॉलनीतील विधाते मळा परिसरातील एका महिलेकडून तिच्या सख्ख्या भाच्याने व्यवसायासाठी घेतलेले तब्बल १७ लाख ५० हजार रुपये परत न करता उलट जिवे ठार मारण्याची धमकी देत फसवणूक के ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Fifty-six lakh rupees make fraud | भाच्यानेच केली साडेसतरा लाख रुपयांची फसवणूक

भाच्यानेच केली साडेसतरा लाख रुपयांची फसवणूक

Next
ठळक मुद्देपोलिसांत तक्रार : व्यवसायाच्या नावाखाली आत्याला लुबाडले

नाशिक : तिडके कॉलनीतील विधाते मळा परिसरातील एका महिलेकडून तिच्या सख्ख्या भाच्याने व्यवसायासाठी घेतलेले तब्बल १७ लाख ५० हजार रुपये परत न करता उलट जिवे ठार मारण्याची धमकी देत फसवणूक
के ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधाते मळ्यातील मनीषा हेमंत विधाते (५०) यांनी नाशिकरोडच्या सामनगावरोड परिसरातील संशयित आरोपी प्रशांत सदानंद गाडेकर याला स्वामी समर्थ टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी दहा लाख रुपये व सात लाख ५० हजार रुपयांचे दागिने दिले होते. या प्रकरणातील आरोपी फिर्यादीच्या भावाचा मुलगा असून, त्यांनी फिर्यादी मनीषा विधाते यांच्याकडून १ नोव्हेंबर १३ पासून ते १ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत रक्कम व सोन्याचे दागिने मिळविले होते.
मनीषा विधाते यांनी त्यांचा भाचा प्रशांत गाडेकर याच्याविरोधात दिलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fifty-six lakh rupees make fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.