एटीएम कार्डचा नंबर मिळवून पन्नास हजारांची फसवणूक गुन्हेगारी घटना : भ्रमणध्वनीवरून आधार व एटीएम नंबर मिळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:13 AM2017-12-02T01:13:59+5:302017-12-02T01:14:34+5:30
स्टेट बँक आॅफ इंडियातून बोलत असल्याचे सांगून एटीएमवरील नंबर व आधारकार्डची माहिती घेऊन एका इसमाची त्याच्या खात्यातून पन्नास हजार रुपयांची अॅमेझॉनवरून आॅनलाइन खरेदी करून फसवणूक करण्यात आल्याची घटना देवळाली कॅम्पमध्ये घडली़
नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियातून बोलत असल्याचे सांगून एटीएमवरील नंबर व आधारकार्डची माहिती घेऊन एका इसमाची त्याच्या खात्यातून पन्नास हजार रुपयांची अॅमेझॉनवरून आॅनलाइन खरेदी करून फसवणूक करण्यात आल्याची घटना देवळाली कॅम्पमध्ये घडली़
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सुरेशकुमार रामचंद्र सिंग (रा. मीडिअम बॅटरी स्कूल, दे. कॅम्प) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांना ८६७७९३५०९८ या क्रमांकावरून फोन आला़ एसबीआयच्या मुंबई शाखेतून बोलत असल्याचे सांगून फोन करणाºयाने सिंग यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती जाणून घेत एटीएमवरील सोळा अंकी नंबर आणि आधारकार्डची माहिती घेतली़ यानंतर सिंग यांच्या बॅँक खात्याद्वारे अॅमेझॉन कंपनीकडून ५० हजार रुपयांची आॅनलाइन खरेदी केली. सिंग यांना आपल्या बँक खात्यातून रक्कम गेल्याचे लक्षात येताच त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ या प्रकरणी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.