यंत्रसामग्रीच्या खरेदीसह ऑक्सिजन प्रकल्पासाठी पावणेतीन कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:09+5:302021-06-02T04:12:09+5:30

मालेगाव शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना कृषिमंत्री भुसे यांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना हात जोडून कोरोना ...

Fifty-three crore sanctioned for oxygen project including purchase of machinery | यंत्रसामग्रीच्या खरेदीसह ऑक्सिजन प्रकल्पासाठी पावणेतीन कोटी मंजूर

यंत्रसामग्रीच्या खरेदीसह ऑक्सिजन प्रकल्पासाठी पावणेतीन कोटी मंजूर

Next

मालेगाव शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना कृषिमंत्री भुसे यांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना हात जोडून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. पहिल्या लाटेत मालेगावी कोराेनाची भयानक परिस्थिती असताना आरोग्य यंत्रणेचा आत्मविश्वास वाढवित खांद्याला खांदा लावून मेहनत घेतली. सलग दोन वर्षांपासून दर आठवड्याला आरोग्यसेवेचा आढावा त्यांच्याकडून घेतला जात आहे. ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाल्यानंतर भुसे यांनी दररोज मध्यरात्री सामान्य रुग्णालयाला भेट देऊन नाशिक, सिन्नर व औरंगाबाद येथून तातडीने ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले होते. रेमडेसिविरचा तुटवडा असताना शहर व तालुक्याला ४०० इंजेक्शन उपलब्ध करून दिले होते. कोविडच्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांकडून अडीच हजार रुपये शुल्क आकारले जात होते. प्रयोगशाळा संचालकांची बैठक घेऊन चाचणी शुल्क २ हजार रुपये निश्चित केले होते. शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. मालेगाव शहरात कृषिमंत्री भुसे यांनी हवेपासून ऑक्सिजनिर्मिती करणारा प्लांट मंजूर केला आहे. या प्लांटमधून शासकीय व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्ध होणार असून, मालेगावसाठी दररोज दीडशे ऑक्सिजन सिलिंडर भरून मिळणार आहेत. दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन मंजूर झाले आहेत. दोन हेल्थ एटीएम मशीन खरेदीसाठी प्रत्येकी ३० हजार असे ६० लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच महापालिकेने आरटीपीसीआर प्रयोगशाळा उभारणीचा प्रस्ताव सादर केला आहे.

इन्फो...

दर आठवड्याला आढावा बैठक

राज्याच्या दौऱ्यावर असतानाही स्थानिक यंत्रणेकडून आरोग्यसेवेचा आढावा कृषिमंत्री भुसे घेत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर आठवड्याला शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली जाते तसेच महापालिकेच्या कोविड सेंटरला व सामान्य रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णांशी संवाद साधत असतात. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अडीअडचणी जाणून घेत असतात.

कोट...

कोरोनाकाळात आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असताना जनजागृती केली आहे. प्रारंभी मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेमध्ये आत्मविश्वास निर्माण करीत रुग्णांना बरे केले. मालेगाव शहर व तालुक्यातून कोरोनाला हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही. सध्या मालेगाव शहर, तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

- दादा भुसे, आमदार, मालेगाव बाह्य

इन्फो...

ऑक्सिजन प्लांटसाठी नियोजन

दोन कोटी ७५ लाख निधी मंजूर

सामान्य रुग्णालयात १०० बेडची व्यवस्था

५८ व्हेंटिलेटर

५ ड्युरा सिलिंडर

२ हेल्थ एटीएम मशीन

===Photopath===

010621\01nsk_7_01062021_13.jpg

===Caption===

मालेगावी शासकीय विश्रामगृहावर कोरोनाबाबत आढावा बैठक घेताना कृषी मंत्री दादा भुसे. समवेत वैद्यकीय अधिकारी.

Web Title: Fifty-three crore sanctioned for oxygen project including purchase of machinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.