व्यापा-यांकडे अडकलेले पावणेतीन कोटी बळीराजाच्या पदरात; ९७ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 04:14 PM2020-10-07T16:14:20+5:302020-10-07T16:18:47+5:30

नाशिक बार असोसिएशनकडून ज्या शेतक-यांचे धनादेश वठलेले नाही, अशा धनादेश बाऊन्स झालेले खटले न्यायालयात विविध तालुका व जिल्हा पातळीवर विनाशुल्क लढविले जातील, असेही दिघावकर यावेळी म्हणाले.

Fifty-three crores stuck to the merchants in the position of Baliraja | व्यापा-यांकडे अडकलेले पावणेतीन कोटी बळीराजाच्या पदरात; ९७ गुन्हे दाखल

व्यापा-यांकडे अडकलेले पावणेतीन कोटी बळीराजाच्या पदरात; ९७ गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देविशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकरांचा दणका५९० शेतक-यांना २ कोटी ७४ लाख ५८२ रुपये प्राप्त झाल्याची माहिती बार असोसिएशन चालविणार मोफत खटला

नाशिक : परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील द्राक्ष, कांदा, डाळींब, केळी उत्पादक शेतक ऱ्यांचे मागील अनेक वर्षांपासून विविध व्यापाऱ्यांकडे मालविक्रीची मोठी रक्कम अडकून पडली होती. बळीराजाच्या कष्टाचा पैसा विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या दणक्याने पदरात पडला आहे. परिक्षेत्रातील सुमारे ५९० शेतक-यांना २ कोटी ७४ लाख ५८२ रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिघावकर यांनी बुधवारी (दि.७) पत्रकार परिषदेत दिली.
शेतक-यांकडून वारंवार याबाबत पाठपुरावा केला जात होता. तसेच पोलिसांकडे यापुर्वीही दाद अनेक शेतक-यांनी मागितली होती; मात्र राजकिय वरदहस्त आणि गुंडांचे पाठबळ असलेल्या व्यापा-यांकडे पोलीस खात्याकडून वक्रदृष्टी केली जात नव्हती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचे भुमिपूत्र असलेले दिघावकर यांनी महिनाभरापुर्वी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरिक्षक पदाची सुत्रे हाती घेतली. यावेळी त्यांनी सर्वप्रथम शेतक-यांचा कष्टाचा पैसा बुडविणाºया व्यापा-यांवर कारवाईचा दंडुका चालविला. पाचही जिल्ह्यांच्या अधीक्षकांना त्यांनी आदेशित करत तत्काळ शेतक-यांच्या फ सवणूक अर्जानुसार संबंधित व्यापा-यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे फर्मान सोडले. यानंतर तब्बल ५९३ शेतक-यांचे अर्ज संपुर्ण परिक्षेत्रातून प्राप्त झाले. त्यापैकी ९७ व्यापा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
ज्या व्यापा-यांकडून शेतक-यांना मालाच्या खरेदीची रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली जात होती, अशा व्यापा-यांचा पोलिसांकडून शोध घेत त्यांच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न करत संबंधित शेतक-याची थकित रक्कम देण्याबाबत ह्यखाकीह्णच्या शैलीत समज दिली गेली.

१३३ व्यापा-यांनी दर्शविली तयारी
१३३व्यापा-यांनी शेतक-यांचे थकविलेली रक्कम देण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात महाराष्टतील लबाड व्यापा-यांचा शोध घेत त्यांचा बंदोबस्त करण्यात येत आहे. दुस-या टप्प्यात देशातील अन्य राज्यांमध्ये नाशिक परिक्षेत्रातील विशेष तपास करणारे दहा पथके धडक देत व्यापा-यांच्या मुसक्या आवळणार असल्याचे दिघावकर म्हणाले. पाचही जिल्ह्यांच्या अधीक्षकांनी दहा विशेष पथकांची नियुक्ती केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बार असोसिएशन चालविणार मोफत खटला
नाशिक बार असोसिएशनकडून ज्या शेतक-यांचे धनादेश वठलेले नाही, अशा धनादेश बाऊन्स झालेले खटले न्यायालयात विविध तालुका व जिल्हा पातळीवर विनाशुल्क लढविले जातील, असेही दिघावकर यावेळी म्हणाले. नाशिक बार असोसिएशनच्या बहुतांश वकिलांनी हा निर्णय बोलून दाखविला असून शेतक-यांच्या कष्टांचा पैसा मिळवून देण्यासाठी सहानुभूती दाखविली आहे.

जिल्हानिहाय मिळालेली रक्कम
नाशिक ग्रामिण - फसवणूक रक्कम - १८ कोटी १३ लाख, २८ हजार २७२
प्राप्त रक्कम- १ कोटी ९ लाख ६६ हजार ९७२
अहमदनगर - फसवणूक रक्कम- १८ लाख ५२ हजार ३४८
प्राप्त रक्कम- २ लाख
जळगाव- फसवणूक रक्कम २६ लाख ७४ हजार ६९१
प्राप्त रक्कम - ३ लाख १२ हजार
नंदुरबार - फसवणूक रक्कम- ५ लाख ९५ हजार ६१०
प्राप्त रक्कम- ५ लाख ९५ हजार ६१०
धुळे- फसवणूक रक्कम ५ लाख १७ हजार (वसुली शुन्य)
----
 

Web Title: Fifty-three crores stuck to the merchants in the position of Baliraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.