ब्रह्मगिरी संवर्धनासाठी सहा राज्यांत उभारणार लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:13 AM2021-06-02T04:13:16+5:302021-06-02T04:13:16+5:30
गोदावरी नदीचे उगमस्थान असलेली ब्रह्मगिरी ही केवळ देशाची नव्हे तर आंतरराष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचे संवर्धन न केल्यास सहा राज्यांवर ...
गोदावरी नदीचे उगमस्थान असलेली ब्रह्मगिरी ही केवळ देशाची नव्हे तर आंतरराष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचे संवर्धन न केल्यास सहा राज्यांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. त्यामुळे निसर्ग संवर्धनाच्या राज्य घटनेतील तत्त्वाच्या विरोधातील कृतीला विरोध करण्यासाठी आधी सरकारला निवेदन देण्यात येईल त्यानंतर गरज पडली तर न्यायालयात जनहित याचिका आणि पुढील टप्प्यात लोकचळवळ उभारण्यात येईल असे राजेंद्रसिंह म्हणाले.
गोदावरी नदीशी संबंधित ब्रह्मगिरीच काय परंतु अन्य कोणत्याही साधन संपत्तीला धोका उत्पन्न होऊ देणार नाही, मात्र राज्य सरकारांनी देखील दक्षता घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
इन्फो...
ब्रह्मगिरीला हानी पोहोचवली जात असताना स्थानिक ग्रामस्थ तसेच येथील मंदिर मठातील संत महात्मे गप्प का असा प्रश्न राजेंद्रसिंह यांनी केला. अशाप्रकारच्या कृत्यात स्थानिक पातळीवर प्रशासन आणि राजकीय लागेबंधे असतात. तसेच येथे तर आत्तापासूनच फॉर्म हाऊस सारखी पर्यटनस्थळे साकारली जात आहेत. त्यास विरोध करण्यासाठी जनचळवळ उभी राहिली पाहिजे असेही राजेंद्रसिंह म्हणाले.
इन्फो..
ब्रह्मगिरीच्या खोदकामाबरोबरच लॉकडाऊनची संधी साधून गेल्या वर्षी येथील वनसंपदा देखील नष्ट केली जात आहेत. नाशिकमध्ये तर रेती उत्खनन देखील सुरू आहे. याबाबत देखील दखल घेतली जाईल असे राजेंद्रसिंह यांनी सांगतानाच लवकरच नाशिकमध्ये येऊन ब्रह्मगिरीला भेट देणार असल्याचे सांगितले.
===Photopath===
010621\01nsk_22_01062021_13.jpg
===Caption===
राजेंद्रसिंह