किडन्या निकामी असूनही कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:58 PM2020-06-08T22:58:38+5:302020-06-09T00:04:05+5:30
दोन्हीही किडन्या निकामी झालेल्या युवकाने कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून त्याला निरोप देण्यात आला. गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्याचे औक्षण करून पुष्पवृष्टी करत स्वागत केले. जिद्द आणि आरोग्य यंत्रणेच्या परिश्रमामुळे या युवकास नव्या दमाने जगण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
नांदूरवैद्य : दोन्हीही किडन्या निकामी झालेल्या युवकाने कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून त्याला निरोप देण्यात आला. गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्याचे औक्षण करून पुष्पवृष्टी करत स्वागत केले. जिद्द आणि आरोग्य यंत्रणेच्या परिश्रमामुळे या युवकास नव्या
दमाने जगण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
दर आठवड्याला डायलिसिस सुरू असलेल्या बेलगाव कुºहे येथील कोरोनाबाधित ५५ वर्षीय रेल्वे कर्मचारी उपचाराअंती दोनच आठवड्यात कोरोनामुक्त झाला. त्यांच्यावर भायखळा येथील मध्य रेल्वेच्या विभागीय रुग्णालयात डायलिसिस उपचार सुरू होते. दरम्यान त्यास कोरोनाची लागण झाली. रुग्णालयाची परवानगी न घेता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता परिवाराने त्यांना थेट मूळ गावी आणले होते. गावात कोरोनाबाधित रुग्ण आल्याचे समजताच खळबळ माजली. बेलगाव कुºहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पथक हजर झाले. त्यांनी तत्काळ रुग्णास रुग्णवाहिकेद्वारे नाशिकला कोविड रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांना क्वॉरण्टाइन करण्यात आले. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले, तर दोन आठवड्यांपासून कोरोनावर उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णाचा अहवालही निगेटिव्ह आल्याने त्यास रुग्णालयातून
घरी सोडण्यात आले. रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी सुखरूप परत आल्याने नातेवाइकांसह ग्रामस्थांनी औक्षण व पुष्पवृष्टी करत त्याचे स्वागत केले.
कोविड १९ विषाणू प्राणघातक असला तरीही बाधित व्यक्तीने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले. स्वच्छता राखून योग्य उपचार घेतले, घाबरून न जाता धैर्याने सामना केला. दोन्हीही किडन्या निकामी झालेला रु ग्णही कोरोनावर मात करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
- डॉ. जी. पी. बांबळे, वैद्यकीय अधिकारी, बेलगाव कुºहे