सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यासाठी लढा - नीलिमा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:59 AM2017-08-12T00:59:03+5:302017-08-12T00:59:08+5:30

गेली पाच वर्षे सभासदांना दिलेल्या वचनांची पूर्ती करताना कर्मवीरांच्या सेवाभावी कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिस्त, गुणवत्ता व पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न केला. केवळ संस्था आणि सभासद हितच डोळ्यासमोर ठेवले. सुसंस्कृत समाज आणि विद्यार्थी घडविण्यासाठी पुन्हा एकदा निवडणूक लढवित असल्याचे प्रतिपादन मावळत्या सरचिटणीस व प्रगती पॅनलच्या नेत्या श्रीमती नीलिमा पवार यांनी केले.

 Fight for Creating Cultured Students - Neelima Pawar | सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यासाठी लढा - नीलिमा पवार

सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यासाठी लढा - नीलिमा पवार

Next

नाशिक : गेली पाच वर्षे सभासदांना दिलेल्या वचनांची पूर्ती करताना कर्मवीरांच्या सेवाभावी कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिस्त, गुणवत्ता व पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न केला. केवळ संस्था आणि सभासद हितच डोळ्यासमोर ठेवले. सुसंस्कृत समाज आणि विद्यार्थी घडविण्यासाठी पुन्हा एकदा निवडणूक लढवित असल्याचे प्रतिपादन मावळत्या सरचिटणीस व प्रगती पॅनलच्या नेत्या श्रीमती नीलिमा पवार यांनी केले.  मागील निवडणुकीत बहुमताने निवडून दिल्यामुळेच मला व माझ्या सहकाºयांना पूर्णत: लोकशाही पद्धतीने व कार्यक्षमपणे संस्थेचा कारभार करण्याची संधी मिळाली. त्यामुळे एकाधिकारशाही किंवा हिटलरशाहीचा आरोप मुळातच दिशाभूल करणारा आहे. शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीच्या आधारे संस्थेची लौकिकार्थाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता आली. यापुढील काळातही संस्थेच्या माध्यमातून समाजाचा विकास साध्य करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. गेल्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकल्यावर संस्थेचा झालेला विकास आपल्यासमोर येईल. संस्थेच्या नवीन १२५ शाखा व ३०१ वर्ग नव्याने सुरू केले. सीबीएसई पॅटर्न किंवा नीटच्या धर्तीवर डिजिटल बॅच सुरू केली. विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू केले. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व रिसर्च सेंटर येथील खाटांची क्षमता ७०० वरून १०५० व नेली. अनेक नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या. विना अनुदानित सेवकांच्या वेतनात ३२ कोटी ८४ लाखांनी वाढ केली. ३८१ सेवकांच्या विना अनुदानितकडून अनुदानित श्रेणीत मान्यता मिळविल्या. ४४ शाखांना नवीन इमारती बांधल्या, तर ४६ इमारतींचे विस्तारीकरण केले.
संस्थेला महाराष्टÑ शासनाचा आदिवासी सेवा संस्था पुरस्कार आपल्याच काळात लाभला. भविष्यात अनेक नवीन संकल्पना व योजना आखल्या आहेत. सर्व शाखांमध्ये प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजासाठी माहिती व तंत्रज्ञान या विभागाचा अंतर्भाव करण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील सीईटीला सामोरे जाण्यासाठी संस्थापातळीवर नवी शैक्षणिक पद्धती सुरू करण्यात येईल. भविष्यात सैनिकी शाळा सुरू करण्याचा मानस आहे. मविप्र रुग्णालयात कॅन्सर सेंटर कोबाल्ट युनिट सुरू करण्यात येईल. इतकेच नव्हे तर मविप्रचा शैक्षणिक दूरचित्रवाहिनी सुरू करण्याचा मानस आहे. मतदारांनी विश्वास, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीला प्रमाण मानून मतदान करावे, असे आवाहन नीलिमा पवार यांनी केले आहे.

Web Title:  Fight for Creating Cultured Students - Neelima Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.