मॉलिवूडमधील नायक-नायिकांचा उदरभरणासाठी झगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:11 AM2021-06-01T04:11:03+5:302021-06-01T04:11:03+5:30

कोरोनामुळे चित्रीकरण ठप्प झाल्याने अनेक कलावंत मिळेल ते काम करीत असून, काम न मिळालेल्या कलाकारांना उपासमार सहन करावी लागत ...

Fight for the heroes and heroines of Mollywood | मॉलिवूडमधील नायक-नायिकांचा उदरभरणासाठी झगडा

मॉलिवूडमधील नायक-नायिकांचा उदरभरणासाठी झगडा

Next

कोरोनामुळे चित्रीकरण ठप्प झाल्याने अनेक कलावंत मिळेल ते काम करीत असून, काम न मिळालेल्या कलाकारांना उपासमार सहन करावी लागत आहे. मॉलिवूडची अभिनेत्री इंद्रायणी गायकवाड स्वतःच मास्क बनवून ऑर्डर घेण्याचे काम करत आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊन असताना देखील बरीच कामे झाली होती. यंदा मात्र काहीच कामे झाली नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात बंद म्हटल्यावर कुठेही शूटिंगला जाता आले नसल्याची खंत तिने व्यक्त केली.

अभिनेते आणि निर्माता जयराम माळी म्हणतात, बॉलिवूडसह जगातल्या सर्वच चित्रपटसृष्टीला कोरोनाचा फटका बसला आहे. यातच संपूर्ण जगात कुतूहलाचा विषय बनलेल्या मालेगावच्या चित्रपटसृष्टीलाही खूप मोठा फटका बसला आहे. कोरोना महामारीत बरेच चित्रीकरण बंद पडले. परंतु, अशाही काळात ‘जैन्या का ढाबा’ नावाचा चित्रपट या काळात पूर्ण केला. मात्र, प्रेक्षकच नसल्यामुळे हा चित्रपट पाहिजे तसे यश संपादन करू शकला नसल्याचे माळी यांनी सांगितले. अभिनेता महेंद्र तिसगे म्हणतो, लॉकडाऊन काळात अनेक कलावंतांची खूप अवघड परिस्थिती निर्माण झाली. जी कामे मिळणार होती ती पुढे ढकलली गेली. ‘वाजवूया बँडबाजा’ हा चित्रपट २० मार्च २०२० पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता. त्यात मी निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. पण, त्यालाही अडचणी आल्या. अखेर एका वाहिनीवर त्याचा प्रीमिअर करण्यात आल्याचेही तिसगे यांनी सांगितले.

इन्फो

उपासमारीची वेळ

सर्वसाधारणपणे यू-ट्युबच्या माध्यमातून मालेगावात लाखोंची उलाढाल होत होती. मात्र, कोरोना काळात सर्व ठप्प झाल्याने बरेच कलावंत बेरोजगार झाले. विशेषतः पॉवर लूमवर काम करून हे लोक चित्रपट माध्यमातून आपली आवड जोपासत होते. मात्र, एकावेळी दोन्ही बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मग अत्यावश्यक सेवा सुरू होत्या म्हणून काही कलावंत भाजीपाला विकू लागले. काही लोक मिळेल ते काम करून आपली उपजीविका भागवू लागले.

इन्फो

चित्रपटांना लागेना मुहूर्त

मागच्या वर्षी कोरोना ओसरला म्हणून मालेगाव कॅम्प भागातील काही हौशी कलावंतांनी ‘अंतरंगी गाव’ या वेबसिरीजची निर्मिती केली. परंतु कोरोना रुग्णसंख्या परत वाढल्याने सर्व ठप्प झाले. ही वेबसिरीज बनूनसुद्धा प्रदर्शित होऊ शकली नाही. याच कलावंतांनी ग्रामीण भागावरच्या समस्यांना केंद्रिभूत ठेवून निर्माण केलेली फिलिमवाडी या वेबसिरीजची तीच तऱ्हा होती. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मालेगावच्या मातीत मालेगावातीलच स्थानिक निर्मात्यांनी बनवलेला पहिला-वहिला मराठी चित्रपट ‘तुझं माझं ॲरेंज मॅरेज’ हा चित्रपट बनूनसुद्धा कोरोनामुळे चित्रपटगृह बंद असल्याने वेळेत रिलीज होऊ शकला नाही.

फोटो- ३१ मालेगाव फिल्म

===Photopath===

310521\31nsk_26_31052021_13.jpg

===Caption===

फोटो- ३१ मालेगाव फिल्म 

Web Title: Fight for the heroes and heroines of Mollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.