मार्केट शुल्काला विरोध करण्यासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:09+5:302020-12-06T04:15:09+5:30

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड अग्रिकल्चरतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर व्यापारी व शेतकऱ्यांकडून मार्केट फी, सेवा ...

Fight to oppose market charges | मार्केट शुल्काला विरोध करण्यासाठी लढा

मार्केट शुल्काला विरोध करण्यासाठी लढा

Next

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड अग्रिकल्चरतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर व्यापारी व शेतकऱ्यांकडून मार्केट फी, सेवा शुल्क व सेसबाबत येणाऱ्या अडचणींसंदर्भात राज्यातील सर्व व्यापारी संघटना, चेंबर यांच्या प्रतिनिधींची बैठक महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आकारण्यात येणाऱ्या मार्केट शुल्क, सेवा शुल्क व सेसला विरोध करण्यासाठी समिती तयार करून एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून व्यापाऱ्यांकडून मार्केट फी, सेस, सेवा शुल्क घेण्यात येत आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाही. तसेच केंद्र सरकारच्या ५ जून रोजीच्या अध्यादेशानुसार शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाच्या विक्री व व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायास चालना देण्यासाठी उत्तेजन व सुविधाकरण अध्यादेश प्रस्थापित केला आहे. या अध्यादेशानुसार पणन संचालकांनी काढलेल्या आदेशाला राज्यात पणन राज्यमंत्री यांनी स्थगिती दिली. मात्र जुन्या पद्धतीने वसुली करावी, असे नमूद करण्यात आलेले नाही. असे असतानाही राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या व्यापाऱ्यांकडून मार्केट फी, सेस, सेवा शुल्क वसूल करत आहे. तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्याच्या तुलनेने जास्त सेस घेण्यात येत आहे. बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे विश्वस्त कैलास खंडेलवाल, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, अनिलकुमार लोढा, संजय दादलिका, प्रफुल्ल संचेती, राजेश मालपुरे, भावेश मानेक, राकेश भंडारी, शंकर ठक्कर, राहुल डागा, विनोद कलंत्री, वैभव सरवदे, शरद शाह, जयंत नावरकर, महेश नावरकर, नितीन वाळके, कीर्ती राणा, रमणिकभाई छेडा, नंदकुमार डागा, प्रदीपभाई कपाडिया, विजय आहुजा, सतीश अटल, स्वप्नील शाह आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

Web Title: Fight to oppose market charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.