रायपूर शिवारात सामाईक बांध फोडल्यावरून मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:12+5:302021-06-24T04:11:12+5:30
------------------------------------------------------------------------ कपडे धुण्यावरून परस्परविरोधी गुन्हे दाखल चांदवड : तालुक्यातील भाटगाव येथे सामायिक हौदावर कपडे धुण्याच्या कारणावरून हाणामारी ...
------------------------------------------------------------------------
कपडे धुण्यावरून परस्परविरोधी गुन्हे दाखल
चांदवड : तालुक्यातील भाटगाव येथे सामायिक हौदावर कपडे धुण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. याबाबत पहिली फिर्याद मिनाबाई रतन पोटे रा. भाटगाव यांनी दिली. यात म्हटले आहे की, अश्विनी मधुकर पोटे, सुरेखा मधुकर पोटे, मधुकर उत्तम पोटे, देवीदास पोटे, उत्तम पोटे, राहुल पोटे, शिवानी पोटे, लीलाबाई पोटे सर्व रा. भाटगाव यांनी मिनाबाईची सून सामायिक हौदावर कपडे धुण्यासाठी गेली असताना वरील सर्वांनी कुरापत काढून गजाने मारहाण केली. मिनाबाईस औषधोपचार करून त्यांच्या फिर्यादीवरून वडनेरभैरव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तर दुसरी फिर्याद देवीदास भिमाजी पोटे यांनी दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नीलेश रतन पोटे, रतन पोटे, मिनाबाई पोटे, शालिनी पोटे, भिकन पोटे, गणेश पोटे, शीतल पोटे, संगीता पोटे सर्व रा. भाटगाव हे, नदीचे खराब पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये का टाकले, या कारणावरून मधुकर उत्तम पोटे याला मारहाण करीत होते. तेव्हा देविदास पोटे हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही सर्वांनी मारहाण केली. तसेच देवीदास पोटे यांची पत्नी सोडविण्यासाठी गेली असता, तेव्हा त्यांचे मंगळसूत्र तुटून नुकसान झाले. अशी फिर्याद दिल्याने वडनेरभैरव पोलीस स्टेशनला परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून सहायक पोलीस निरीक्षक गणोश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. डी. अहिरे तपास करीत आहेत.
----------------------------------------------------
हिरापूरला शेतीच्या बांधावरून दोन गटात वाद
चांदवड : तालुक्यातील हिरापूर शिवारात शेताचा बांध का कोरताय व शेतातील गवत का काढताय, या कारणावरून दोन कुटुंबात वाद झाला. याबाबत मोतीराम शिवराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गट नंबर ६३९ मध्ये रावसाहेब निवृत्ती कांगुने, शिला कांगुने, निवृत्ती कांगुने, सर्व रा. हिरापुर यांनी मोतीराम चव्हाण हे त्यांचे सामायिक बांधावर विलायतचे गवत काढत असताना आमच्या शेतीचा बांध का कोरताय व तुम्ही शेतातील गवत का काढताय यावरून रावसाहेब कांगुने यांनी हातातील काठीने मोतीराम चव्हाण व त्यांच्या पत्नीस मारहाण केली. अशी फिर्याद मोतीराम चव्हाण यांनी दिल्याने वडनेरभैरव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस निरीक्षक गणोश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. डी. अहिरे तपास करीत आहेत.
-------------------------------------------------