सभासदांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष - नितीन ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:01 AM2017-08-12T01:01:11+5:302017-08-12T01:01:17+5:30

संस्थेला खासगीकरण होण्यापासून वाचविण्यासाठी निवडणुकीच्या रिंंगणात पुन्हा आम्ही उतरलो आहोत. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे चूक असेल, तर ती केली आहे. समाजासाठी आणि समाजाच्या या मोठ्या शिक्षण संस्थेत सभासद आणि समाजबांधव व पाल्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ही निवडणूक लढवित असल्याचे प्रतिपादन मावळते सभापती व समाज विकास पॅनलचे नेते अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले.

 Fight for Right to the Rights of Members - Nitin Thackeray | सभासदांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष - नितीन ठाकरे

सभासदांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष - नितीन ठाकरे

Next

नाशिक : संस्थेला खासगीकरण होण्यापासून वाचविण्यासाठी निवडणुकीच्या रिंंगणात पुन्हा आम्ही उतरलो आहोत. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे चूक असेल, तर ती केली आहे. समाजासाठी आणि समाजाच्या या मोठ्या शिक्षण संस्थेत सभासद आणि समाजबांधव व पाल्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ही निवडणूक लढवित असल्याचे प्रतिपादन मावळते सभापती व समाज विकास पॅनलचे नेते अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. संस्थेचे खासगीकरण होण्याचा धोका विद्यमान सत्ताधाºयांच्या कार्यकाळात होता. तो टाळण्यासाठीच सातत्याने संघर्ष केला. आमचे अध्यक्ष व सभापती नसते तर संस्थेची वाटचाल खासगी- करणाच्या दिशेने झाली असती. त्यामुळे टीडीआर विक्री प्रकरण असो की अन्य प्रकरण, चुकीच्या गोष्टींना विरोध करून कोणत्याही ठरावाच्या मंजुरीवर स्वाक्षरी केली नाही. आम्ही सत्तेवर आल्यास शंभर टक्के पारदर्शक कारभार करणार. संस्थेच्या किंवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोणत्याही साहित्य खरेदीसाठी शासन निर्णयानुसारच ई-टेंडरिंग करणार. कोणत्याही सभासद पाल्यांकडून प्रवेशासाठी शुल्क आकारले जाणार नाही. रोख स्वरूपात कोणत्याही देणग्यांचा स्वीकार करणार नाही. देणग्या असतील तर त्या धनादेशाद्वारेच स्वीकारण्याची पद्धत सुरू करणार आहोत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची सेवाज्येष्ठता यादी संस्थेच्या संकेतस्थळावर (वेबसाइटवर) प्रसिद्ध करण्यात येईल. त्यात कोणतीही अनियमितता किंवा यादी खाली वर केली जाणार नाही. सद्यस्थितीत ही सेवाज्येष्ठता यादी खाली वर करण्याबाबत आर्थिक आरोप होतात. कुठल्याही शाळेच्या कर्मचाºयांवर संस्थेचे व संचालकांचे नियंत्रण राहिलेले नाही. साधे शिपाईसुद्धा मुख्याध्यापकांवर हेरगिरीच्या कामासाठी नेमले जातात. त्यामुळे मुख्याध्यापक कामकाज करण्यास धजत नाही. आम्ही सत्तेवर आल्यास हे बंद होईल. संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी व यूपीएससीच्या परीक्षा देण्यासाठी मोेफत विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करणार आहोत. समाज विकास पॅनल सत्तेवर आल्यास संस्थेच्या कोणत्याही सभासद अथवा सभासदांच्या पाल्यास प्रवेशापासून कोणत्याही शैक्षणिक अडचणींपासून दूर ठेवू. सभासद पती किंवा पत्नीला आडगाव येथील मेडिकल महाविद्यालयात आरोग्यविषयक मोफत उपचार देऊ. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही. संस्थेच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी सदैव तयार आहोत. मतदारांनी विश्वास, गुणवत्ता व पारदर्शकता या तीन सचोट्या पाहूनच मतदान करावे, असे आवाहन अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले आहे.

Web Title:  Fight for Right to the Rights of Members - Nitin Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.