लष्करी अळीचा फटका, दीड एकर मक्यावर फिरविला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:50 PM2019-09-20T12:50:37+5:302019-09-20T12:51:11+5:30
विरगाव (बागलाण) : मका पिकावरील लष्करी अळीने हैराण झालेल्या तरसाळी येथील गोपीनाथ पाटील मोहन या शेतकऱ्याने दीड एकर मका पिकावर ट्रॅक्टर फिरविला.
विरगाव (बागलाण) : मका पिकावरील लष्करी अळीने हैराण झालेल्या तरसाळी येथील गोपीनाथ पाटील मोहन या शेतकऱ्याने दीड एकर मका पिकावर ट्रॅक्टर फिरविला. अळी निर्मूलनासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करूनही यात अपयश आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे पेरणी तसेच फवारणीवर झालेला खर्च वाया गेला असून त्यांना हजारो रूपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
चालू वर्षी संपूर्ण बागलाण तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीने आक्र मण केल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. पहिल्या टप्प्यातील मका पिकावर या अळीच्या आक्र मणाचे प्रमाण काही अंशी कमी असले तरीही मात्र दुसºया टप्प्यातील मका पीक या अळीस पूर्णपणे बळी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. हे नगदी पीक वाचविण्यासाठी सद्यस्थितीत तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असून अनेक वेगवेगळी रासायनिक औषधांची फवारणी करून अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
तालुका कृषी विभागाकडूनही या अळीच्या अटकावासाठी मोफत मार्गदर्शन तसेच औषधे पुरवली जात असून या उपरोक्तही ह्या अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहेत. याचमुळे वैतागलेल्या शेतकरी वर्गाकडून हे नगदी पीक मोडून अन्य पीक लागवडीकडे कल वाढला असून तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील मका याचमुळे मोडीस निघतांना दिसत आहे. तरसाळी येथील गोपीनाथ मोहन यांनीही याचमुळे आपल्या शेतात लागवड केलेल्या साडेतीन एकर क्षेत्रापैकी दीड एकर क्षेत्रावर वैतागून ट्रॅक्टर फिरविला आहे. यामुळे झालेला हजारो रु पयांचा खर्च वाया गेला असून पीकविम्यासाठी ते संबधित कंपनीकडे दाद मागणार आहेत.