हिंग्लाजनगर भागात दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:11+5:302021-06-20T04:11:11+5:30

------------- मुलीचा विनयभंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हा मालेगाव : तालुक्यातील जळगाव गा. येथे १४ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या बाळू मुरलीधर बोरसे ...

Fighting between two groups in Hinglajnagar area | हिंग्लाजनगर भागात दोन गटांत हाणामारी

हिंग्लाजनगर भागात दोन गटांत हाणामारी

Next

-------------

मुलीचा विनयभंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

मालेगाव : तालुक्यातील जळगाव गा. येथे १४ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या बाळू मुरलीधर बोरसे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी पाणी भरण्यासाठी गेली असता बाळू बोरसे याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार पवार करीत आहेत.

----

कार चोरून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हा

मालेगाव : शहरातील मोतीतालाब भागातील अडीच लाख रुपये किमतीची कार समीर खान आलम खान याने चोरून नेली आहे. याप्रकरणी सय्यद जलील सय्यद इब्राहीम यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची कार क्रमांक एम.एच. ०३, बीसी ०९४० ही समीर खान याने खोटेनाटे सांगून चोरून नेली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.

----

तलवारीने वार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

मालेगाव : मागील भांडणाची कुरापत काढून तरुणावर तलवारीने वार केल्याप्रकरणी मसूद चोरवा (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहंमद रिजवान मोहंमद सईद यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ रशीद हा घरासमोर उभा असताना मागील भांडणाची कुरापत काढून मसूद चोरवा याने तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात रशीद हा जखमी झाला आहे. पुढील तपास हवालदार वाघ करीत आहेत.

----

दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी

मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर पाटणे शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात उद्धव प्रवीण पगार, राजवीर प्रवीण पगार हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर जीभाऊ पगार यांनी फिर्याद दिली आहे. दुचाकी क्रमांक एम. एच. ४१ एक्यू. १०५४ वरील चालक (नाव माहीत नाही) याने दुचाकी क्रमांक एम. एच. ४१, एव्ही ५१३७ हिला धडक दिली. या धडकेत दोघे जखमी झाले. याप्रकरणी पुढील तपास हवालदार तिडके करीत आहेत.

Web Title: Fighting between two groups in Hinglajnagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.