कवी पाठारे यांच्या अत्यसंस्काराच्या वेळी स्मशानातच हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 12:51 AM2021-12-29T00:51:11+5:302021-12-29T00:51:29+5:30
अन्यायाच्या प्रतिकाराचे ज्याने गीत लेखन केले, त्या विनायक पाठारे यांच्या वाटेला आयुष्यभर उपेक्षा सहन करावी लागली आणि इतकेच नव्हे तर त्यांची अखेर झाल्यानंतरही जे घडले ते मरणाहून मरण या प्रकारातले होते. मंगळवारी (दि. २८) आगरटाकळीजवळ गोदाकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांची चिताही शांत होत नाही तोच त्यांच्या सहानुभूतीपोटी आलेल्या राजकीय नेत्यांची माथी भडकली. आपसातील वैमनस्यापोटी स्मशान शांतता भंग करीत सरणाची लाकडे हातात घेऊन एकमेकांवर धावून गेलेल्या नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तेथेच एकमेकांवर हात उगारत याच स्मशानात माणुसकीचीही अखेरच केली. माजी महापौर आणि त्यांंच्या चिरंजीवांसह साऱ्यांचाच सहभाग असल्याने अत्यंयात्रेस जमलेली सारेच संवेदनशील मने विषण्ण झाली.
नाशिक : अन्यायाच्या प्रतिकाराचे ज्याने गीत लेखन केले, त्या विनायक पाठारे यांच्या वाटेला आयुष्यभर उपेक्षा सहन करावी लागली आणि इतकेच नव्हे तर त्यांची अखेर झाल्यानंतरही जे घडले ते मरणाहून मरण या प्रकारातले होते. मंगळवारी (दि. २८) आगरटाकळीजवळ गोदाकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांची चिताही शांत होत नाही तोच त्यांच्या सहानुभूतीपोटी आलेल्या राजकीय नेत्यांची माथी भडकली. आपसातील वैमनस्यापोटी स्मशान शांतता भंग करीत सरणाची लाकडे हातात घेऊन एकमेकांवर धावून गेलेल्या नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तेथेच एकमेकांवर हात उगारत याच स्मशानात माणुसकीचीही अखेरच केली. माजी महापौर आणि त्यांंच्या चिरंजीवांसह साऱ्यांचाच सहभाग असल्याने अत्यंयात्रेस जमलेली सारेच संवेदनशील मने विषण्ण झाली.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेची मंगळवारी दिवसभर शहरात चर्चा होती. जनमानसात माणुसकी, सजगता पेरणारे विनायक पाठारे यांची जिवंतपणी इतकी जितकी उपेक्षा झाली त्यापेक्षा अधिक अन्याय या घटनेने झाला.