मालेगावी जावेद पार्कमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:12+5:302021-06-22T04:11:12+5:30
---- बोहरा बाग भागात खुनाचा प्रयत्न मालेगाव : शहरातील बोहरा बाग भागात हाणामारी झाली असून याप्रकरणी शेख जमीर शेख ...
----
बोहरा बाग भागात खुनाचा प्रयत्न
मालेगाव : शहरातील बोहरा बाग भागात हाणामारी झाली असून याप्रकरणी शेख जमीर शेख हारुण ऊर्फ टारझन रा. रसुलपुरा व इतर तिघांविरोधात किल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. जियाउररहेमान लईक अहमद यांनी याबाबत फिर्याद दिली. फिर्यादी व त्याचा मित्र अबुजर घरासमोर बसले असताना फिर्यादीने टाकलेल्या फेसबुक पोस्टवर जाब विचारल्याने जमीर शेख याने फिर्यादीस उचलून जमिनीवर आपटले व इतर तिघांनी धारदार हत्याराने मानेवर, पाठीवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास उपनिरीक्षक खरगे करीत आहेत.
----
कुरापत काढून मारहाण
मालेगाव : तालुक्यातील लेंडाणे शिवारात मागील भांडणाची कुरापत काढून हाणामारी झाली असून याप्रकरणी सुनील कारभारी अहिरे याचे विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब तुकाराम अहिरे यांनी याबाबत फिर्याद दिली. संशयिताने मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ अभय तुकाराम अहिरे यांना चाकूने पोटावर मारून दुखापत केली. तसेच जीवे ठार मारण्याचा दम दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक बच्छाव करीत आहेत.
----
ओट्याच्या बांधकामावरून मारहाण
मालेगाव : तालुक्यातील कुकाणे येथे आंबेडकर नगरात ओट्याचे वाढवा काम करू नका, असे सांगितल्याचा रा. आल्याने शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी समाधान रतन अहिरे, राहुल रतन अहिरे, गौतम पुंजाराम हेळंगे, बायटाबाई गौतम हेळंगे रा. कुकाणे यांच्या विरोधात वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश दगा पगारे यांनी याबाबत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस नाईक शिरसाठ करीत आहेत.
----
सोयगावातून दुचाकी चोरी
मालेगाव : शहरातील सोयगाव येथील बोरसे नगरातून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी (क्रमांक एमएच ४१ एजे ०२८६) चोरून नेली. याप्रकरणी छावणीप्रकरणी छावणी पोलिसात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील सोनू वरखेडे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस नाईक वाघ करीत आहेत.