‘पिठे गँग’च्या टोळक्याकडून पंचवटीत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:54+5:302021-02-09T04:16:54+5:30
---- पोलिसांना खबर दिल्याने मारहाण नाशिक : पोलिसांना खबर दिल्याचा राग आल्याने एकास लाथाबुक्क्याने व दगडाने मारहाण करण्यात ...
----
पोलिसांना खबर दिल्याने मारहाण
नाशिक : पोलिसांना खबर दिल्याचा राग आल्याने एकास लाथाबुक्क्याने व दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विक्रांत अनिल गांगुर्डे (रा. आगरटाकळी) याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित चेतन गडवे विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी (दि. ७) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी विक्रांत गांगुर्डे हा नाशिक-पुणे मार्गवर एका पेट्रोल पंपावर असताना संशयित चेतन गडवे तेथे आला आणि ‘पोलिसांना माहिती का दिली’ असा जाब विचारत विक्रांतला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करत विक्रांतच्या मोबाइलचा अपहार केला.
---------
न्यायालयाच्या आवारातून दुचाकी गायब
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारातील ध्वजाच्या स्तंभाजवळ वाहनतळा एका वकिलाने नेहमीप्रमाणे सकाळी उभी केलेली दुचाकी पहारेकरी पोलिसांच्या डोळ्यात चोरट्याने धुळफेक करत लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी फिर्यादी ॲड. अजिंक्य गुळवे (रा.जुना आडगावनाका) यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि. ६) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास गुळवे यांनी स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ -डीडब्ल्यू ३०१९) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अवारातील वाहनतळात उभी केली होती. संध्याकाळी कामकाज आटोपून ते दुचाकी लावलेल्या ठिकाणी आले असता तेथून त्यांची दुचाकी गायब करण्यात आलेली होती. चोरट्याने १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे दुचाकीचोर त्या कॅमेऱ्यात बंदिस्त होऊ न शकल्याने गुळवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
------
दुचाकीस्वाराच्या डोक्यावर शस्त्राने वार
नाशिक : दुचाकीने घराकडे जात असलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना महावीर कॉलनीच्या परिसरात घडली. याप्रकरणी फिर्यादी परवेज राजू शेख (रा. कथडा, जुने नाशिक) याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दोघा अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. ६) रात्री साडेनऊच्या सुमारास शेख त्यांच्या मोटारसायकलवरून महावीर कॉलनीसमोरून जात होते. यावेळी पाठीमागून दुचाकीने आलेल्या दोघांनी शेख यांच्या डोक्यात धारदार जड अशा वस्तूने मारल्याने ते रस्त्यावर खाली कोसळून जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेला मित्र फैजान शेख याने परवेज यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
----