लाठ्या-काठ्यांनी हाणामारी ढकांबे : तिघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:10 PM2020-09-23T17:10:23+5:302020-09-23T17:11:07+5:30
वणी : ढकांबे शिवारातील वस्तीजवळ फिर्यादी व साक्षीदार यांना लाठ्या-काठ्यांनी हाणामारी मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देमारहाण केल्याची फिर्याद सानप यांच्या पत्नीने दिंडोरी पोलिसात दिल्याने बोडके व इतर दोघांवर गुन्हा दाखल
वणी : ढकांबे शिवारातील वस्तीजवळ फिर्यादी व साक्षीदार यांना लाठ्या-काठ्यांनी हाणामारी मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद सानप यांनी सुरगाणा तालुक्यातुन शेतीतील कामासाठी मजुर आणले होते. सदरचे मजुर सानप यांच्या शेतजमीनीतुन काम करु न लगतच्या बोडके यांच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. तेव्हा प्रमोद सानप यांनी मजुरांना सांगितले की तुम्ही आमचेकडे येऊ नका येथेच राहा यावरु न बोडके व इतर दोघांनी फिर्यादी व साक्षिदार यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याची फिर्याद सानप यांच्या पत्नीने दिंडोरी पोलिसात दिल्याने बोडके व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.