लग्नाच्या वादातून झटापट; लासलगावी महिला पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:09 AM2020-02-16T02:09:56+5:302020-02-16T02:11:32+5:30

लासलगाव बसस्थानकात लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत एक तीसवर्षीय महिला अंगावर पेट्रोल पडून पेटल्याने गंभीररीत्या भाजल्याची घटनाघडली आहे. त्यात सदर महिला ६७ टक्के भाजली असून, दोन संशयिताना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर मुख्य संशयित फरार झाला आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत तिचा जबाब घेण्याचे काम सुरू होते.

Fights through the marriage vows; Lasalgavi women burnt | लग्नाच्या वादातून झटापट; लासलगावी महिला पेटली

लग्नाच्या वादातून झटापट; लासलगावी महिला पेटली

Next
ठळक मुद्देबसस्थानकात घडला प्रकार दोघे ताब्यात; मुख्य संशयित फरार

नाशिक : जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकात लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत एक तीसवर्षीय महिला अंगावर पेट्रोल पडून पेटल्याने गंभीररीत्या भाजल्याची घटनाघडली आहे. त्यात सदर महिला ६७ टक्के भाजली असून, दोन संशयिताना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर मुख्य संशयित फरार झाला आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत तिचा जबाब घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन महिलेची भेट घेतली व घडल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली.
जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकात सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले असून, तिने शेजारीच राहणाऱ्या रामेश्वर मधुकर भागवत (रा. इंदिरानगर) याचेशी दोन महिन्यांपूर्वी एका मंदिरात विवाह केला होता. तथापि, या विवाहाला रामेश्वरच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. यासंदर्भातच चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि. १५) सदर महिला तिच्या ज्युपिटर दुचाकीने (क्र. एमएच १५ एचए ७२७७), तर तिचा दुसरा पती रामेश्वर ऊर्फ बाला मधुकर भागवत हा त्याची होंडाने (क्र. एमएच १५ इआर ९०८३) लासलगाव बसस्थानक येथे आले होते. महिलेसोबत दत्तू बाळा जाधव हा युवकदेखील
होता. बसस्थानकातच महिलेचा रामेश्वरसोबत वाद झाला. यावेळी झालेल्या झटापटीत महिलेने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल दोघांच्या अंगावर पडले व पेट घेतल्याने त्यात महिला गंभीररीत्या भाजली. यावेळी बसस्थानकात असलेल्या प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविली. महिलेला तातडीने
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघात की पेटविले?
प्राथमिक माहितीनुसार, सदर महिलेला पेटवून दिल्याची चर्चा असली तरी आपसातील वादातून व झटापटीतून तिने आणलेले पेट्रोल अंगावर पडून अपघाताने ती पेटली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे नेमके तिला पेटविले गेले की अपघाताने ती पेटली याबद्दलच्या तपासावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
नातलगांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
च्पीडित महिला नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात सायं. ६.४० वाजता दाखल झाली. त्यावेळी तिच्यासोबत महिला पोलीस कर्मचाºयांव्यतिरिक्त एकही नातलग उपस्थित नव्हता. मात्र उशिरा दाखल झालेल्या नातलगांनी घडलेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाईच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.

Web Title: Fights through the marriage vows; Lasalgavi women burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.