महिलेवर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:00+5:302021-06-03T04:11:00+5:30
---- मागील भांडणाची कुरापत काढून हाणामारी मालेगाव : शहरातील भायगाव शिवारात राहणाऱ्या सोमेश्वर बारकू पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ ...
----
मागील भांडणाची कुरापत काढून हाणामारी
मालेगाव : शहरातील भायगाव शिवारात राहणाऱ्या सोमेश्वर बारकू पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाटील यांनी फिर्याद दिली आहे. मागील भांडणाची कुरापत काढून रूपेश ठाकूर, सचिन पाटील, योगेश डोंगरे यांनी घरात घुसून दगडाने मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिरसाठ करीत आहेत.
----
आंबेडकरनगर भागातून दुचाकी लंपास
मालेगाव : शहरालगतच्या द्याने येथील आंबेडकरनगर भागातून १२ हजार रूपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण साहेबराव आहिरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ बीबी ३५६९ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पानपाटील करीत आहेत.
----
संगमेश्वरात किरकोळ कारणावरुन हाणामारी
मालेगाव : येथील संगमेश्वर भागातील जगताप गल्लीत किरकोळ कुरापत काढून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्ता बिरारी यांनी फिर्याद दिली आहे. किरकोळ कुरापत काढून उबैद, परवेझ (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आखाडे करीत आहेत.
----
पदोन्नतीत आरक्षण नाकारणारा आदेश अन्यायकारक असल्याची तक्रार
मालेगाव : मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण नाकारणारा आदेश अन्यायकारक असल्याची तक्रार करीत शासनाने हा आदेश रद्द करावा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्य शासनाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकार विरोधात नाराजी निर्माण झाली आहे. हा शासन आदेश असंवैधानिक व सामाजिक न्यायाची पायमल्ली करणारा आहे. प्रशासनातील मागासवर्गीय यंत्रणेने या आदेशाद्वारे पदोन्नतीतून आरक्षण रद्द करण्याचा घाट रचला आहे. या आदेशामुळे शासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. हा आदेश रद्द करावा, अशी मागणी आढाव यांच्यासह दीपक पानपाटील, मिथुन बोराळे, आनंद कापडणीस, मंगला आढाव, अमोल जाधव, सिद्धार्थ अहिरे, शरद हातगे, अमोल अहिरे, अनिल अहिरे, बापू अहिरे, नंदा कापडणीस, संजय नहिरे, निलेश आहेर आदींनी केली आहे.
-----
रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्यासाठी आंदोलन
मालेगाव : शहरातील रावळगाव नाका ते साई बाजार पर्यंतचे रस्त्यावरील धोकेदायक विद्युत खांब हटविण्यात यावे या मागणीसाठी वंदेमातरम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सोमवार बाजारात धरणे आंदोलन केले होते. यावेळी वीज कंपनीच्या व मनपाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सोमवार बाजारातील मुख्य रस्त्यावर मध्यभागी विद्युत खांब आहेत. यामुळे वारंवार अपघात होत असतात. महापालिकेकडे याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. या भागातील विद्युत खांब तातडीने हटवावेत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात संघटनेचे जगदीश गोऱ्हे, शीतल चोरडिया, संजय घुले, यज्ञेश अहिरराव, सागर परदेशी, उदय वैद्य आदी सहभागी झाले होते.
फोटो फाईल नेम : ०२ एमजेयुएन ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव सोमवार बाजार रस्त्यावरील विद्युत खांब हटवावेत या मागणीसाठी धरणे आंदोलन करताना जगदीश गोऱ्हे, शीतल चोरडिया, संजय घुले, यज्ञेश अहिरराव, सागर परदेशी, उदय वैद्य आदी.
===Photopath===
020621\02nsk_1_02062021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहे.