भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:52 PM2021-03-11T22:52:23+5:302021-03-12T00:47:46+5:30

नाशिक : शहरातील एका व्हॉट‌्सॲप ग्रुपमध्ये बुधवारी (दि.१०) एका समाजाच्या भावना दुखविणारी ह्यपोस्टह्ण एका संशयित समाजकंटकाने व्हायरल केली. याप्रकरणी संध्याकाळी काही नागरिकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेत, त्या समाजकंटकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी तात्काळ संशयिताचा माग काढत त्यास बेड्या ठोकल्या.

Filed a case of emotional trauma | भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देअफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.

नाशिक : शहरातील एका व्हॉट‌्सॲप ग्रुपमध्ये बुधवारी (दि.१०) एका समाजाच्या भावना दुखविणारी ह्यपोस्टह्ण एका संशयित समाजकंटकाने व्हायरल केली. याप्रकरणी संध्याकाळी काही नागरिकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेत, त्या समाजकंटकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी तात्काळ संशयिताचा माग काढत त्यास बेड्या ठोकल्या.

याप्रकरणी संशयिताच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम १५३(अ), २९५(अ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाला कारवाईची संपूर्ण माहिती देत, कायदा कुणीही हातात घेऊ नये आणि कुठल्याही प्रकारे अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. यानंतर जमलेले नागरिक निघून गेले.

Web Title: Filed a case of emotional trauma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.