विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:21 PM2020-07-01T23:21:15+5:302020-07-02T00:28:13+5:30
बेलतगव्हाण येथे युवतीच्या घराबाहेर शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी दोन भावांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.
नाशिकरोड : बेलतगव्हाण येथे युवतीच्या घराबाहेर शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी दोन
भावांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.
बेलतगव्हाण येथील पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घरी असताना सोनू व त्याचा भाऊ मोनू बाळू दोंदे हे घराबाहेर येऊन शिवीगाळ करू लागले. युवतीने त्यांना शिवीगाळ का करता, असे विचारले असता ते दोघे हात पकडून ओढू लागले. युवतीचे वडील आले असता दोघेजण पळून गेले. या अगोदरही सोनूने युवतीच्या मोबाइलवर संदेश पाठविला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित दोंदेबंधूविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतजमीन व्यवहारापोटी रक्कम न देता फसवणूक
नाशिकरोड : शेतजमिनी खरेदीचा व्यवहार करून जमिनीचे खरेदीखत करून त्यानंतर जमिनीचे सव्वादोन लाखांची रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेलरोड हरी विहार सोसायटीतील कैलास बाबूराव मैंद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लाखलगाव येथील ६.७५ आर इतकी शेतजमीन ओळखीचे किरण शिवाजीराव पाटील (रा. शिवकृपा, संत ज्ञानेश्वरनगर, दसक, जेलरोड) यांना विक्र ी करण्याचा व्यवहार झाला होता. किरण पाटील यांनी सदर शेत जमिनीपोटी सव्वादोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत गेल्यावर्षी आक्टोबरमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत नोंदविले होते. आमचे चांगले संबंध असल्याने मी पैसे नंतर भेटणार असले तरी खरेदीखत करून दिले होते. मात्र किरण पाटील यांनी पैसे आज उद्या देतो, असे सांगून टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मैंद यांनी सदर जमिनीचा सातबारा उतारा काढला असता किरण पाटील याने शेतजमीन अनंत अशोक मालपाणी यांना विकलेली असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी संशयित किरणा पाटील यांच्याविरु द्ध उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.