रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:15 AM2021-04-05T01:15:47+5:302021-04-05T01:16:42+5:30

नाशिकरोड येथील दुर्गा उद्यानासमोरील रेडियंट प्लस रुग्णालयात कोरोना उपचार घेणाऱ्या वयोवृध्द महिलेचे निधन झाल्यानंतर शनिवारी रात्री त्या महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयात डॉक्टर व मेडिकलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण करीत काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Filed a case of vandalism in the hospital | रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next

नाशिकरोड : येथील दुर्गा उद्यानासमोरील रेडियंट प्लस रुग्णालयात कोरोना उपचार घेणाऱ्या वयोवृध्द महिलेचे निधन झाल्यानंतर शनिवारी रात्री त्या महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयात डॉक्टर व मेडिकलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण करीत काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      
डॉ. धनंजय बाजीराव शंखपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २६ मार्चला सायंकाळी जेलरोड लोखंडे मळा अनमोल पार्क येथे राहणाऱ्या केशराबाई नरहरी सांबारे (६७) यांना त्यांच्या नातेवाइकांनी कोविड उपचारासाठी दाखल केले होते. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास नातेवाईक रुग्णालयात येऊन आम्ही रुग्ण केशराबाई यांना दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत, असे सांगून डिस्चार्ज घेतला. परंतु, त्यानंतर कोणीही  केशरबाई यांना घेण्यास आले नाही, असे फिर्यादित म्हटले आहे. रात्री पावणेनऊच्या सुमारास उपचार सुरू असताना केशराबाई यांचे निधन झाल्याने याबाबत रुग्णालयाकडून त्यांच्या नातेवाइकांना  कळविण्यात आले. त्यानंतर केशराबाईंचे दहा-बारा नातेवाईक डॉ. शंखपाळ यांच्या केबिनमध्ये येऊन शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने लोखंडी रॉडने रुग्णालयातील मेडिकलची काच फोडली.  

Web Title: Filed a case of vandalism in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.