तलवारीने केक कापणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 01:16 AM2021-10-21T01:16:17+5:302021-10-21T01:17:01+5:30
मखमलाबाद शिवारातील सिद्धार्थनगरला वाढदिवसानिमित्ताने तलवारीने केक कापणे एका युवकाला महागात पडले आहे. तलवारीने केक कापल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : मखमलाबाद शिवारातील सिद्धार्थनगरला वाढदिवसानिमित्ताने तलवारीने केक कापणे एका युवकाला महागात पडले आहे. तलवारीने केक कापल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मखमलाबादच्या सिद्धार्थनगर भागात संशयित मयूर पीतांबर सोनवणे (वय २६) यांच्याकडे तलवार असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे म्हसरूळ पोलिसांना मिळाली. त्यावरून म्हसरूळ गुन्हेशोध पथकाने संशयित मयूरला ताब्यात घेतले. संशयित मयूर सोनवणे याचा मंगळवारी वाढदिवस होता. त्याचे मित्र परिवार केक घेऊन आले तेव्हा मयूरने तलवारीने केक कापला व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले होते. सोनवणे याच्यावर यापूर्वी कोरोना कालावधीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.