देवगाव, रूई येथे गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 04:30 PM2020-04-19T16:30:58+5:302020-04-19T16:31:37+5:30

देवगाव : करोना संसर्गजन्य रोगाची साथ सुरु असताना तोंडाला मास्क अगर रु माल न लावता शासनाच्या संचारबंदी आदेशाला झुगारु न ग्रामस्थांच्या आरोग्याला हानी पोहचेल असे वर्तन करणाऱ्या देवगाव येथील दोघावर तर रु ई येथील पाच वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर दोघावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filed in Devgaon, Rui | देवगाव, रूई येथे गुन्हे दाखल

देवगाव, रूई येथे गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देकरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी सुरू

देवगाव : करोना संसर्गजन्य रोगाची साथ सुरु असताना तोंडाला मास्क अगर रु माल न लावता शासनाच्या संचारबंदी आदेशाला झुगारु न ग्रामस्थांच्या आरोग्याला हानी पोहचेल असे वर्तन करणाऱ्या देवगाव येथील दोघावर तर रु ई येथील पाच वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर दोघावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर लासलगाव पोलिसांकडुन १८८ कलमानुसार कारवाई सुरू करण्यात आली. त्या पार्श्वभुमीवर लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सांयकाळी कारवाई करण्यात आली.
देवगाव दोन तर रु ई येथे विनाकारण काम नसताना दुचाकी घेऊन फिरत असताना पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर दोघावर तोडांला मास्क अथवा रूमाल न बांधता गावात निष्काळजीपणे फिरत असतांना यामुळे पोलिसांनी १८८,२६९,१७६ कलमानुसार दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार मधुकर उंबरे, हवालदार इरफान शहा या प्रकरणी तपास करत आहेत.
चौकट...
करोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असुन जिल्ह्यात रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणीही नागरीक फिरतांना आढळुन आल्यास तसेच विनाकारण फिरतांना व तोडांला मास्क लावणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- मधुकर उंबरे, बीट हवालदार देवगाव.

Web Title: Filed in Devgaon, Rui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.