कांदा साठवणुकीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:57 AM2019-03-15T00:57:56+5:302019-03-15T00:58:58+5:30

परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहे. सध्या कसमादे भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून गारपीट, अवकाळी पाऊस व यावर्षी दुष्काळाचे दुष्टचक्र मागे लागलेले असताना या सर्व संकटावर मात करून कांदा पिकविला. हाच कांदा आता बाजारात पाचशे ते आठशे रुपयांनी विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असून, बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.

Fill the onion storage | कांदा साठवणुकीवर भर

कांदा साठवणुकीवर भर

googlenewsNext

खामखेडा : येथील परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहे. सध्या कसमादे भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून गारपीट, अवकाळी पाऊस व यावर्षी दुष्काळाचे दुष्टचक्र मागे लागलेले असताना या सर्व संकटावर मात करून कांदा पिकविला. हाच कांदा आता बाजारात पाचशे ते आठशे रुपयांनी विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असून, बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणूक केल्याशिवाय पर्याय नाही.
गेल्या वर्षी उन्हाळ कांद्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन झाल्याने कांदा काढणीच्या वेळेस आज ज्या भावात कांदा विकला जात आहे, त्याच भावात गेल्या वर्षी विकला जात होता, तेव्हा पुढे भाववाढ होईल या आशेवर शेतकऱ्याने चाळीत कांदा साठवणूक केली होती; परंतु पूर्ण वर्षभर कांद्याच्या भावात वाढ झाली नाही. कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेवर नोव्हेंबर महिन्यापर्यंत ठेवला; परंतु भाव वाढला नाही. तेव्हा कांदा चाळीत सडला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. हा कांदा चाळीतून काढून उकिरड्यावर फेकावा लागला. तरीही या वर्षी मोठ्या हिमतीने शेतकºयाने कांद्याची लागवड केली आहे. या कांदा पिकासाठी
उधार, उसनवार पैसे आणून उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे; परंतु पाहिजे तसा भाव नसल्याने तो चाळीत ठेवत आहे.
यावर्षी चांगल्या वातावरणामुळे अल्पसा पाऊस असूनही शेतकरी वर्गाला कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर साधले आहे; मात्र उत्पादन खर्च हजार रुपये एकरी असताना कांद्याला मिळत असलेल्या सरासरी पाचशे ते आठशे रु पये बाजारभावामुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीस जोर देऊ लागला आहे.

मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा शेतकरी साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या खामखेडा परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
गिरणा परिसरातील खामखेड, भऊर, बगडू, पिळकोस, बेज, भादवण, विसापूर या परिसरामध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी अल्पशा पावसावर लागवड केलेल्या कांद्यास अल्प बाजारभाव मिळत असल्याने शेतकरीवर्गाने कांदा साठवणुकीवर भर दिला आहे.
यावर्षी कांदा पिकास पोषक वातावरण असल्याने साठवणुकीच्या क्षमतेपेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याने तसेच सध्या कांद्यास सरासरी चारशे ते सातशे रु पयापर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देऊ लागला
आहे.

अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी कायमस्वरूपी केलेल्या सोयी कांदा चाळी भरून गेल्याने खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी परिसरात तात्पुरते कुड व अन्य सोयी उभारून कांदा साठविण्याची तयारी करीत आहे.

Web Title: Fill the onion storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.