कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या असंतोषात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:37 PM2018-11-28T18:37:20+5:302018-11-28T18:37:31+5:30
कळवण : कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या असंतोषात भर पडली असून, कळवण येथे संतप्त कांदा उत्पादक शेतकºयांनी कांद्याला हमीभाव मिळावा, अशा घोषणा देत बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयावर धाव घेऊन इमारतीच्या पायरीवर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पायरीवर कांदा ओतून सरकारचा निषेध केला.
कळवण : कांद्याच्या भावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या असंतोषात भर पडली असून, कळवण येथे संतप्त कांदा उत्पादक शेतकºयांनी कांद्याला हमीभाव मिळावा, अशा घोषणा देत बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयावर धाव घेऊन इमारतीच्या पायरीवर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पायरीवर कांदा ओतून सरकारचा निषेध केला.
कळवण बाजार समितीत नाकोडा, अभोणा व कनाशी येथे कांद्याचे लिलाव होतात. कांद्याला केवळ दोनशे ते पाचशे रु पये भाव असल्याचे निदर्शनास आल्याने गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये कमालीची चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे आज बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडून शेतकºयांनी असंतोषाला वाट करून देत रस्तावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. २ डिसेंबरच्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी कळवण तालुक्यातील नांदुरी येथे येणार असल्याने जिल्हा व तालुका पातळीवरील प्रशासकीय यंत्रणा नियोजनात व्यस्त आहे.
कांदा मातीमोल भावाने विक्र ी करावी लागत असल्याने कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून, सरकारवर रोष व्यक्त करून कांदा उत्पादक रास्ता रोको आंदोलन करीत असल्याने त्यांची दखल घेऊन कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला वेळ नसल्याने कांदा उत्पादकांनी उघड नाराजी व्यक्त करून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयावर मिळेल त्या वाहनातून धाव घेतली.
कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या मांडून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी अर्धातास ठिय्या आंदोलन केले. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका करत सरकारने कांदाला हमीभाव द्यावा व कळवण तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनी करून मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित नांदुरी येथील कार्यक्र म उधळून लावण्याचा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिरे यांनी ठिय्या आंदोलनप्रसंगी बोलताना दिला. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कांदा उत्पादकानी परिसर दणाणून सोडला.
शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार यांनी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असून उत्पादन खर्चावर आधारित कांदाला भाव द्यावा, शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करून सरकारवर टीकास्त्र सोडले, शेतकरी हिताचे धोरण सरकारने स्वीकारावे नाही तर सरकार विरोधात जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी दिला.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आंदोलनस्थळी येऊन कांदा उत्पादकांचे निवेदन स्वीकारावे अशी भूमिका घेऊन कांद्याला हमीभाव द्यावा अशी जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र देवरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, कारभारी आहेर, पोपटराव पवार, मोहन जाधव, प्रवीण रांैदळ यांनी तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन दिले. यावेळी कृष्णा बच्छाव, सुभाष शिरोडे, के. के. शिंदे, दादा देशमुख, प्रभाकर निकम, टीनू पगार, प्रदीप पगार, संदीप वाघ, तेजस जाधव, रोशन जाधव, गोरख देवरे, आशुतोष आहेर आदींसह मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.