युवकावर भर दिवसा गोळीबार

By admin | Published: June 30, 2017 12:59 AM2017-06-30T00:59:04+5:302017-06-30T00:59:22+5:30

पंचवटी : पेठरोडवरील एका हॉटेलात फुलेनगर येथील संदीप अशोक लाड (२९) या युवकावर तिघा हल्लेखोरांनी गोळीबार करून जखमी केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.

Filled with a lot of stress on the youth | युवकावर भर दिवसा गोळीबार

युवकावर भर दिवसा गोळीबार

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : पेठरोडवरील एका हॉटेलात फुलेनगर येथील संदीप अशोक लाड (२९) या युवकावर तिघा हल्लेखोरांनी गोळीबार करून जखमी केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात लाड याच्या उजव्या खांद्याच्या खाली गोळी लागल्याने तो जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजता सदर घटना घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारे हल्लेखोर हे फुलेनगर परिसरातच राहणारे असून, ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्लेखोरांत एका अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेठरोड फुलेनगर मच्छी बाजारात राहणारा लाड हा दुपारी पावणे तीन वाजता डॉ. बच्छाव हॉस्पिटलशेजारी असलेल्या एका हॉटेलात चहा घेत असताना दोन ते तीन संशयितांनी लाड याच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. बेसावध असलेल्या लाड याच्या उजव्या खांद्याच्या खाली गोळी लागल्याने तो जखमी झाला त्यानंतर त्याला लागलीच उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सूरज बोडके यांच्या फिर्यादीवरून संशयित शेखर निकम, केतन निकम, संदीप पगारे, विशाल भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, हे चौघेही फरार आहेत.
पेठरोडवरील फुलेनगर पोलीस चौकीपासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी पोलीस ताफा दाखल होऊन बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Web Title: Filled with a lot of stress on the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.